Ajinkya Rahane Exclusive
esakal
Ajinkya Rahane Felicitation Ceremony : भारतीय संघाचा माजी कर्णधार, माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे खेळाडू म्हणूनच नव्हे, तर माणूस म्हणूनही किती साधा आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या अजिंक्यचे आज तो राहत असलेल्या W54 इमारतीच्या रहिवाशांकडून सत्कार करण्यात आला. भारताचे कसोटी क्रिकेट गाजवणारा अजिंक्य पुन्हा एकदा भावुक झालेला पाहायला मिळाला.
निवृत्ती जाहीर करताना अजिंक्यचा डोळ्यात डाटून आलेले अश्रू पुन्हा एकदा आज पाहायला मिळाले. अजिंक्यसाठी पुन्हा एकदा त्याची पत्नी राधिका हिने हा सप्राईज सोहळा आयोजित करण्यास मदत केली. यावेळी तिने अजिंक्यच्या प्रवासातील असा एक क्षण सांगितला आणि तो सांगताना तिला रडू आवरले नाही. त्यावेळी अजिंक्यने तिला सावरले.