अजिंक्य रहाणे लवकरच होणार बाबा

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जुलै 2019

भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे लवकरच बाबा होणार आहे. त्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नी राधिकाच्या डोहाळेजेवणाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.  

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे लवकरच बाबा होणार आहे. त्याने स्वत: त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नी राधिकाच्या डोहाळेजेवणाचा फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.  

अजिंक्य आणि राधिका या मराठमोळ्या जोडीने 26 नोव्हेंबर 2014मध्ये लग्न केले आहे. हे दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane) on

विंडीज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात रहाणेची निवड करण्यात आली आहे. कर्णधार विराट कोहलीनेही रहाणे आमच्या संघाचा आधारस्तंभ असल्याचे मत व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Rahane expecting a baby