esakal | अजिंक्य रहाणेच्या बॅटिंग फॉर्मबद्दल कोच विक्रम राठोड म्हणतात...
sakal

बोलून बातमी शोधा

Ajinkya-Rahane

अजिंक्य रहाणेच्या बॅटिंग फॉर्मबद्दल कोच राठोड म्हणतात...

sakal_logo
By
विराज भागवत

Ind vs Eng: गेल्या २२ डावांत रहाणेच्या बॅटमधून केवळ २ अर्धशतके

Ind vs Eng: भारतीय संघ पहिल्या डावात ९९ धावांची पिछाडीवर असताना टीम इंडियाचा दुसरा डाव ४६६ धावांवर संपुष्टात आला. सलामीवीर रोहित शर्माचे धडाकेबाज शतक आणि चेतेश्वर पुजारा, शार्दूल ठाकूर व ऋषभ पंतची अर्धशतके यांच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात ही मजल मारली. विराटनेही ४४ धावा केल्या. पण अजिंक्य रहाणेला अद्यापही सूर गवसला नाही. त्यामुळे त्याच्यावर टीका करण्यात आली. पण अजिंक्यचा फॉर्म हा चिंतेची बाब नसल्याचे फलंदजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: IND vs ENG: भारताच्या गोलंदाजांचा कस; सामना रंगतदार स्थितीत

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने गेल्या २२ डावांमध्ये केवळ २ अर्धशतके ठोकली. शतक करणं तर त्याला जमलेलंच नाही. याबद्दल विक्रम राठोड म्हणाले, "अजिंक्यचा सध्याचा फॉर्म ही चिंतेची बाब नाही. मी आधीसुद्धा म्हटलंय की जेव्हा माणूस दीर्घकाळ क्रिकेट खेळत असतो तेव्हा त्याला मध्ये मध्ये वाईट फॉर्मचा एक टप्पा येतो. अशा वेळी त्या फलंदाजांला पाठिंबा देणे आणि त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे असते."

हेही वाचा: IND vs ENG : ओव्हलवर अश्विन 'अलोन'; फोटो व्हायरल

"चेतेश्वर पुजारादेखील बरेच दिवस फॉर्मशी झुंजत होता. त्याला संघाकडून संधी देण्यात आल्या. त्यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले. अत्यंत कठीण प्रसंगात पुजाराने दमदार कामगिरी करत भारतासाठी उपयुक्त खेळी केल्या. त्याच्यासारखीच अपेक्षा साऱ्यांना अजिंक्य रहाणेकडून आहे. आम्हाला असं वाटतं की अजिंक्य रहाणेदेखील लवकरच फॉर्ममध्ये परतेल आणि भारतीय फलंदाजीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल", असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला.

loading image
go to top