Cricket Record : एलेक्स कॅरीचा वर्ल्ड रेकॉर्ड, पंतला टाकलं मागे

पंतने पदार्पणाच्या सामन्यात सात गडी बाद केले होते.
Rishabh Pant and Alex Carey
Rishabh Pant and Alex CareySakal

घरच्या मैदानावर (गाबा कसोटी Gabba Test) पाहुण्या इंग्लंडला पराभवाचा दणका दिला. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या एलेक्स कॅरीसाठी (Alex Carey) हा सामना खास राहिला. आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने विश्व विक्रमाला (World Record) गवसणी घातली. 30 वर्षीय एलेक्सनं पहिल्याच सामन्यात विकेटमागे आठ किंवा त्यापेक्षा अधिक झेल टिपण्याचा पराक्रम केला.

यापूर्वी इंग्लंडच्या क्रिस रेड (Chris Read) आणि ऑस्ट्रेलियाच्या ब्रायन टॅबर (Brian Taber) या यष्टीरक्षकांनी पदार्पणाच्या सामन्यात 7 झेल पकडले होते. या दोघांचा विक्रम मागे टाकण्यासोबतच एलेक्स कॅरीनं भारतीय संघाचा विकेट किपर बॅटर रिषभ पंत (Rishabh Pant) लाही मागे टाकले. पंतने पदार्पणाच्या सामन्यात सात गडी बाद केले होते. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉकने यष्टीमागची जबाबदारी पहिल्यांदा पार पाडताना 9 गड्यांना तंबूत धाडले होते. पण त्याचा तो पदार्पणाचा सामना नव्हता. ही कामगिरी करण्यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघात पदार्पण केले होते.

Rishabh Pant and Alex Carey
Ashes : भारताने जे करुन दाखवले ते इंग्लंडला जमलेच नाही!

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख पार पाडल्यानंतर फलंदाजांनीही दमदार खेळ दाखवला. मार्कस हॅरिस अवघ्या 3 धावा करुन स्वस्तात माघारी फिरल्यानंतर डेविड वॉर्नह 94(176) (David Warner) आणि मार्स लाबुशेने 74(117) (Marnus Labuschagne) या जोडीनं 156 धावांची दमदार भागीदारी केली. ट्रॅविस हेडनं (Travis Head) 148 चेंडूत 152 धावांची खेळी करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. या तिकडीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 425 धावा केल्या. दुसऱ्या डावातही इंग्लंड़ला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावांत आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाला अवघ्या 20 धावांचे लक्ष्य मिळाले होते. एक विकेट गमावून कांगारुंनी हे टार्गेट सहज पार करत दिमाखात विजय नोंदवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com