
Ronaldo Statue : गोव्यातील पुतळ्यासाठी किती खर्च आला माहितीये?
पोर्तुगालचा कर्णधार आणि फुटबॉल जगतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू असलेल्या ख्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) चा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे. देशातील गोव्यात फुटबॉल प्रेमींचा एक मोठा वर्ग आहे. याठिकाणी प्रेमापोटी चाहत्यांनी रोनाल्डोचा भव्य दिव्य पुतळाच उभारला आहे. पाच वेळा बॅलेन डी ऑर पुरस्काराने सन्मानित झालेल्या रोनाल्डोला गोव्याची राजधानी असलेल्या पणजीमध्ये पुतळा उभारण्यात आला आहे. इंग्लंडच्या मँचेस्टर यूनायटेड क्लबकडून खेळणाऱ्या रोनाल्डाची पुतळ्याचे वजन हे 410 किलो आहे. युवा खेळाडूंना प्रेरणा मिळावी. राज्य आणि देशातील फुटबॉलचा दर्जा सुधारावा. युवा खेळाडू घडावेत या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आला आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार गोव्याचे मंत्री मायकल लोबो म्हणाले की, भारतामध्ये रोनाल्डोचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. गोव्यात हे साकार झाले. युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा एकमेव हेतू यामागे आहे. फुटबॉल जगतात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी रोनाल्डोचा पुतळा प्रेरणा देईल. युवा मुले मुली या पुतळ्यासमोर सेल्फी घेतील आणि यातून त्यांना प्रेरणाही मिळेल.
हेही वाचा: विराटच्या विकेटमागचं 'राज' सोशल मीडियावर होतय व्हायरल
मायकल लोबो पुढे म्हणाले, "सरकार, नगर पालिका आणि पंचायत क्रीडा क्षेत्राचा दर्जा उत्तम करण्यासाठी प्रयत्नशील असतील. खेळाच्या मैदानासह खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सर्वोत्तम प्रशिक्षकांची गरज आहे. यामाध्यमातूनच आपण खेळाचा दर्जा उच्च पातळीवर घेऊन जाऊ शकतो.
हेही वाचा: टीम इंडियासाठी खूष खबर तर दक्षिण आफ्रिकेची वाढली चिंता
फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल डागण्याचा विक्रम असलेल्या रोनाल्डो वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होण्याचं स्वप्न अजून अधूर आहे. त्याच्या नावे 794 गोल आहेत. गोव्यात जी रोनाल्डोचा पुतळा उभारण्यात आलाय त्यासाठी जवळपास 12 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. तीन वर्षांपासून याचे काम सुरु होते. कोरोनामुळे पुतळा उभारण्यात विलंब झाला.
Web Title: All You Need To Know About Cristiano Ronaldo Statue Installed In Goa
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..