वामिकनंच नाही तर 'या' पोरीनं देखील बापाचं कौतुक केलयं | along side Vamika Kohli Quinton De Kock daughter Photo Also viral on social media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Quinton De Kock daughter Photo Also viral

वामिकनंच नाही तर 'या' पोरीनं देखील बापाचं कौतुक केलयं

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेने (South Africa) एकदिवसीय मालिकेत भारताला ३-० अशा व्हाईट वॉश दिला. तिसऱ्या सामन्यात भारताचा अवघ्या चार धावंनी पराभव झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर २८७ धावांचा डोंगर उभारला होता. यात आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डि कॉकने (Quinton De Kock) १२४ धावांची शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. आफ्रिकेच्या २८७ धावांना पाठलाग करताना भारताने देखील चांगली झुंज दिली. भारताकडून विराट कोहलीने (Virat Kohli) ६५ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दीपक चहरने (Deepak Chahar) ५४ धावा करत अखेरपर्यंत झुंज दिली. (along side Vamika Kohli Quinton De Kock daughter Photo Also viral on social media)

हेही वाचा: VIDEO : ... अन् विरुष्काच्या लेकीचा चेहरा झळकला टीव्हीवर

दरम्यान, विराट कोहलीने ज्यावेळी आपले अर्धशतक ठोकले त्यावेळी त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका (Virat Kohli Daughter) यांनी विराटचे प्रेक्षक गॅलरीत उभे राहून अभिनंदन केले. याच वेळी संपूर्ण जगाने वामिकाच्या चेहऱ्याची पहिली झलक पाहिली. त्यामुळे कालपासूनच वामिका कोहली (Vamika Kohli) ट्रेंडिगवर होती.

हेही वाचा: SA vs IND : क्विंटनची कमाल; टीम इंडियाविरुद्ध सेंच्युरीचा 'षटकार'

मात्र तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात फक्त चिमुकल्या वामिकानेच आपल्या बाबांच्या अर्धशतकी खेळीचे कौतुक केले नाही. तर क्विंटन डि कॉकच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीने (Quinton De Kock Daughter) देखील आपल्या वडिलांच्या शतकी खेळीचे अभिनंदन केले. क्विंटन डि कॉकच्या पत्नीने (Quinton De Kock wife) साशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या मुलीचा फोटो शेअर केला. डिकॉक शतकाजवळ पोहत होता त्यावेळी साशाने आपल्या मुलीचा टीव्ही स्क्रीनजवळ फोटो काढला आणि तो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. याला तिने 'वेल डन डॅडी' असे कॅप्शनही दिले.

हेही वाचा: VIDEO: पुष्पा सारखं आता बांगलादेशी क्रिकेटरही म्हणतोय, झुकेगा नही मैं!

क्विंटन डि कॉकचे हे १७ वे एकदिवसीय शतक होते. क्विंटन डि कॉकने आपल्या मुलीच्या जन्मानंतर लगेचच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने आता कुटुंबाला वेळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Web Title: Along Side Vamika Kohli Quinton De Kock Daughter Photo Also Viral On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top