esakal | तुझ्या धैर्याला तोड नाही; अजिंक्यच्या बायकोची भावूक पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika and Ajinkya Rahane

तुझ्या धैर्याला तोड नाही; अजिंक्यच्या बायकोची भावूक पोस्ट

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची नुकतीच दशकपूर्ती झाली. दहा वर्षांपूर्वी 31 ऑगस्ट 2011 रोजी इंग्लंड विरुद्ध मँचेस्टरच्या मैदानातून त्याने टी20 सामन्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची धमाकेदार सुरुवात करणारा अजिंक्य रहाणे सध्या इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरताना दिसतोय.

त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला ट्रोल करण्यात येत असून चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यातून रहाणेला डच्चू देऊन दुसऱ्या खेळाडूला संधी द्यावी, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील संघर्षमय परिस्थितीत अडकलेल्या अंजिक्यसाठी त्याची पत्नी राधिका हिने एक खास मेसेज दिलाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून दशकपूर्तीसाठी भावूक संदेश लिहिताना राधिकानं अजिंक्यच्या टीकाकारांनाही टोला लगावलाय.

हेही वाचा: बीसीसीआय होणार आणखी मालामाल

राधिकाने इंस्टाग्रामच्या माध्यमातून खास पोस्ट शेअर केलीये. तिने लिहिलंय की, 'दहा वर्षांचा पल्ला कधी पार केलास समजलंच नाही. पहाटे पाच वाजतो मुंबई लोकल ट्रेनचा प्रवास, देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षांनुवर्ष घेतलेली मेहनत आणि आंतरराष्ट्रीय कॅप मिळवण्याची प्रतिक्षा! आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढ-उताराचा सामना केलास. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची तुझी साहसी वृत्ती आजही कायम आहे. तुझा इथपर्यंतचा प्रवास अभिमानास्पद आहे. मी नेहमी तुझ्या सोबत आहे, अशा आशयाची पोस्ट अजिंक्य रहाणेच्या पत्नीने इन्स्टाग्रामवरुन शेअर केलीये. त्याच्या प्रवासाची कहाणी सांगत तिने अंजिक्यला ट्रोल करणाऱ्यांना संयमी पद्धतीने उत्तरच दिले आहे.

हेही वाचा: "आक्रमकपणा विराटला भोवतोय, त्याची सत्ता गाजवण्याची सवय..."

इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात अंजिक्य रहाणेकडून नावाला साजेसा खेळ झालेला नाही. लॉर्डसच्या कसोटी सामन्यातील अर्धशतकासह त्याने 5 डावात 95 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि पुजाराच्या शतकी भागीदारीच्या जोरावरच क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाने दमदार कमबॅक केले होते. आणि सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली होती. लीड्सच्या मैदानात अजिंक्यकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण तो अपयशी ठरला. टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे टीम इंडियाला लीड्सच्या मैदानातील कसोटी सामना गमवावा लागला. इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली असून चौथ्या कसोटी सामन्यात कोणता संघ आघाडी घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top