
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली जीममध्ये व्यायाम करत असताना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील वूडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुलगा आणि बीसीसीआय सचिव जय शहा यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. बीसीसीआयचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधीत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांना नुकताच ह्रदय विकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अँजिप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती आता स्थिर असली तरी काही दिवस ते विश्रांतीवर असतील. त्यामुळे त्यांची जबाबदारी आता जय शहा यांच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
AusvsInd : अखेरच्या काही मिनिटांत मिळाले बारा वाजण्याचे संकेत!
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली जीममध्ये व्यायाम करत असताना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील वूडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी अद्यापही त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळेच बीसीसीआयचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सूत्रेही जय शहा यांच्या हाती असणार आहेत.
क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या
यंदाच्या वर्षी रंगणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धा आणि 2023 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसंदर्भातही बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. आयसीसीच्या मोठ्या स्पर्धा आयोजनासाठी करात सवलत मिळावी, यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. यासंदर्भात बीसीसीआय सचिव जय शहा आणि खजिनदार अरुण धुमाळ पाठपुरावा करतील, अशी माहितीही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.