Amitabh Choudhary : झारखंड क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे निधन

रांची येथील संतेविता रुग्णालयात 62 व्या वर्षी घेतला त्यांनी अखेरचा श्वास
amitabh choudhary
amitabh choudharysakal
Updated on

Amitabh Choudhary : झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशनचे (JSCA) माजी अध्यक्ष आणि झारखंड लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बीसीसीआयमध्ये अमिताभ चौधरी कार्यकारी सचिवपद भूषवले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. रांची येथील संतेविता रुग्णालयात 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

amitabh choudhary
Team India : टीम इंडियाच्या 'या' खेळाडूची संपत्ती 100 कोटींहून अधिक

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अमिताभ चौधरी यांचा जन्म 6 जुलै 1960 रोजी झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांची जेपीएससीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. या वर्षी 5 जुलै रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. अमिताभ चौधरी हे झारखंडमधील प्रसिद्ध लोकांपैकी एक होते ज्यांनी शासन, प्रशासन, क्रिकेट आणि राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली.

amitabh choudhary
Asia Cup 2022 : IND vs PAK सामन्याचे तिकिटे काही मिनिटांतच गेली विकल्या

बीसीसीआयचे 2002 मध्ये अमिताभ चौधरी सदस्य झाले. 2005 मध्ये झारखंडचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांचा पराभव करून ते झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (JSCA) चे अध्यक्ष बनले. 2005 ते 2009 या काळात क्रिकेट टीम इंडियाचे व्यवस्थापकही होते. 2014 मध्ये अमिताभ यांनी राजकारणात पाऊल ठेवले. भाजपकडून तिकीट न मिळाल्याने अमिताभ यांनी बाबुलाल मरांडी यांच्या पक्ष जेव्हीएमकडून रांची लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र त्यांना निवडणूक जिंकता आली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com