AUS vs WI : ऑस्ट्रेलियात कॅरिबियन खेळाडूचे तुफानी वादळ! टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची विश्वविक्रमी भागीदारी

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यात पर्थ येथे खेळला जात आहे.
Andre Russell-Sherfane Rutherford break world record marathi news
Andre Russell-Sherfane Rutherford break world record marathi newssakal

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यात पर्थ येथे खेळला जात आहे. मालिका गमावलेल्या वेस्ट इंडिजकडून आज तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली.

प्रथम खेळताना वेस्ट इंडिजने 20 षटकांत 6 बाद 220 धावा केल्या. याचे श्रेय आंद्रे रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड या जोडीला जाते. या दोघांनी जबरदस्त फलंदाजी करत टी-20 मध्ये सहाव्या विकेटसाठी भागीदारीचा विश्वविक्रम केला.

Andre Russell-Sherfane Rutherford break world record marathi news
Dattajirao Gaekwad Dies : क्रिकेट विश्वात पसरली शोककळा! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराने घेतला जगाचा अखेरचा निरोप

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सुरुवातीला चुकीचा असल्याचे दिसत होते. एकापाठोपाठ एक विकेट पडत असल्याने नवव्या षटकात एके काळी धावसंख्या 79/5 झाली होती, आणि संघ खूप अडचणीत असल्याचे दिसत होते. येथून शेरफेन रदरफोर्डने आक्रमक वृत्ती दाखवली आणि आंद्रे रसेलने त्याला साथ दिली. यादरम्यान रदरफोर्डने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर दोघांमधील शतकी भागीदारीही पूर्ण झाली.

Andre Russell-Sherfane Rutherford break world record marathi news
Ind vs Eng : साहेबांचा संघ पुन्हा सापडला अडचणीत! 'या' खेळाडूला थांबवले विमानतळावर, जाणून घ्या प्रकरण

वेस्ट इंडिजच्या डावातील 19व्या षटकात आंद्रे रसेलचे तुफान पाहिला मिळाले आणि त्याने ॲडम झाम्पाविरुद्ध 28 धावा ठोकल्या आणि आपले अर्धशतकही पूर्ण केले. अंतिम षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी रसेलने 29 चेंडूत 71 धावा केल्या, तर रदरफोर्ड 40 चेंडूत 67 धावा करून नाबाद राहिला.

या दोघांमध्ये 67 चेंडूत 139 धावांची भागीदारी झाली, जी टी-20 मध्ये सहाव्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी हा विक्रम पापुआ न्यू गिनीच्या टोनी उरा आणि नॉर्मन वानुआ यांच्या नावावर होता. 2022 मध्ये या दोघांनी सिंगापूरविरुद्ध सहाव्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या होत्या आणि या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com