esakal | बॅटिंगला रसल अन् बॉलिंगला स्टार्क... 6 चेंडूत 11 धावांची गरज; पाहा पुढे काय घडलं...
sakal

बोलून बातमी शोधा

Russell-vs-Starc

Video: रसल vs स्टार्क, 6 चेंडूत 11 धावा... पाहा पुढे काय घडलं...

sakal_logo
By
विराज भागवत

सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला पण...

बार्बाडोस: टी२० विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ जोरदार तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियाने (Australia) वन डे विश्वचषक अनेकदा जिंकला असला तरी त्यांना अद्याप टी२० विश्वचषकावर (T20 World Cup) हवी तशी छाप सोडता आलेली नाही. त्यामुळे सध्या विंडीज (West Indies) विरूद्ध सुरू असलेल्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ आपल्या कलागुणांना धार लावताना दिसत आहे. दुसरीकडे विंडिजचा संघदेखील टी२० मध्ये तगडा आहे. नुकतीच या दोन संघांमध्ये चौथी टी२० रंगली. या टी२०मध्ये खास आकर्षणाचा क्षण ठरला तो म्हणजे रसलच्या (Andre Russell) बॅटिंगपुढे मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) गोलंदाजी... (Video Goes Viral)

हेही वाचा: मुछे हो तो धोनी जैसी... MSचा लेटेस्ट फोटो झाला व्हायरल

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १८९ धावा केल्या. मिचेल मार्श (७५) आणि आरोन फिंच (५३) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर त्यांनी धावसंख्या उभारली. त्यानंतर विंडिजकडून सलमीवीर सिमन्सने ७२ धावांची धडाकेबाज खेळी केली. पण इतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे विंडिजला शेवटच्या षटकात ६ चेंडूत ११ धावा हव्या होत्या. त्यावेळी फलंदाजीसाठी आंद्रे रसल होता तर गोलंदाजीसाठी मिचेल स्टार्क होता. या दोघांमध्ये चांगलंच द्वंद रंगलं. त्यात अखेर ऑस्ट्रेलियाचा विजय झाला.

पाहा कसा रंगला शेवटच्या ओव्हरमध्ये सामना-

हेही वाचा: ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन

रसलच्या फलंदाजीची स्टाईल सगळ्यांनाच माहिती असल्याने स्टार्कने अगदी शिस्तबद्ध गोलंदाजी केली आणि योग्य ठिकाणी फिल्डर उभे केले. त्यामुळे रसलला चौकार किंवा षटकार लगावताच आला नाही. अखेर एका चेंडूत ११ धावांवर परिस्थिती आली तेव्हा शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार लगावला. पण त्यावेळी वेळ निघून गेली होती.

loading image