esakal | ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन
sakal

बोलून बातमी शोधा

file

ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन

sakal_logo
By
विराज भागवत

BCCIने खेळाडूचं नाव सांगितलेलं नाही

लंडन: विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अपेक्षेपेक्षा खराब कामगिरी केली. त्याचा फटका संघाला बसला. आता 4 ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. ५ सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे. या मालिकेआधी इंग्लंडमध्ये टीम इंडियाचे खेळाडू विश्रांती घेत आहेत आणि बाहेर फेरफटका मारतानाही दिसत आहेत. मात्र, याच दरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत. तसेच, तो त्याच्या मित्राच्या घरी क्वारंटाईन असल्याचेही वृत्त आहे. (Rishabh Pant tested positive for Covid 19 in self-isolation at friend's place in London says Source vjb 91)

हेही वाचा: इंग्लंडचा मालिकेवर कब्जा, स्फोटक फलंदाजीनं स्मृतीनं मनं जिंकली

इंग्लंडमध्ये असलेल्या टीम इंडियातील एका खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे असे BCCIने सांगितले होते. मात्र, BCCIने अद्याप त्या खेळाडूचे नाव जाहीर केलेले नाही. असे असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार, तो खेळाडू ऋषभ पंतच आहे असं सांगितलं जातंय. टाइम्सनाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पंतला ८ दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. तेव्हापासून तो लंडनमधील त्याच्या एका मित्राच्या घरी होम क्वारंटाइन झाला आहे. १५ जुलैला लंडनहून डुरहॅमला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचा समावेश नव्हता. तो कोरोनातून पूर्णपणे बरा झाला की मगच डुरहॅमला रवाना होणार आहे.

हेही वाचा: इंग्लंडमधील भारतीय खेळाडूला कोरोनाची लागण

ऋषभ पंत आपल्या काही मित्रांसोबत वेंब्ले स्टेडियममध्ये गेला होता. युरो कपमधील साखळी फेरीत इंग्लंड विरूद्ध जर्मनी या सामन्यादरम्यान पंत स्टेडियममध्ये दिसला होता. सध्या जरी पंतला कोरोनाची लागण झाली असली तरी त्या कोणतीही लक्षणे नाहीत. तो पूर्णपणे ठणठणीत आहे. "पंत सध्या मित्राच्या घरात क्वारंटाईन आहे. तो गुरूवारी डुरहॅमला जाणार नाही', अशी माहिती BCCI च्या सूत्रांनी पीटीआयला दिली.

हेही वाचा: चाहत्यांचा काही नेम नाही!! 'मेस्सी बिडी'चा फोटो व्हायरल

ऋषभ पंत इतर खेळाडूंसोबत सुट्टीचा आनंद घेत नव्हता. तो मित्रांसोबत दुसरीकडे होता. त्यामुळे त्याच्याकडून इतरांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमीच आहे. पण सर्वच खेळाडू सुट्ट्यांचा आनंद घेत होते, त्यामुळे त्यातील काही लोकांना लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

loading image