World Cup 2019 : आंद्रे रसेल वर्ल्ड कपच्या बाहेर

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जून 2019

विश्वकरंडक आता रंगरतदार होत चालला असतानाच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. विंडीजने त्याच्या जागी सुनील अंब्रिस याची निवड केली आहे. 

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडक आता रंगरतदार होत चालला असतानाच वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल दुखापतीमुळे विश्वकरंडकाच्या बाहेर गेला आहे. विंडीजने त्याच्या जागी सुनील अंब्रिस याची निवड केली आहे. 

विश्वकरंडकात चार सामन्यांमध्ये पाच विकेट घेणाऱ्या रसेलच्या गुडघ्याला झालेली दुखापत सामन्यांत दिसत होती. त्यामुळे विंडीज व्यवस्थापनाने त्याला बदलण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने या निर्णयाबरोबरच अंब्रिसच्या निवडीसही संमती दिली आहे. त्याच्याऐवजी सुनील अंब्रिसला संघात स्थान देण्यात आले आहे.  

ओल्ड ट्रॅफर्डवर 27 तारखेला भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी तो संघात दाखल होईल आणि संघासह सरावही करेल. त्याने आतापर्यंत 105.33च्या सरासरीने सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 316 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 148 आहे. 

विंडीज सध्या तीन गुणांसह गुणतक्त्यात आठव्या क्रमांकावर आहे. त्यांनी सहापैकी केवळ एका सामन्यात विजय मिळविला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andre Russell ruled out of World Cup 2019 with injury