
मॅकडोनाल्ड झाले ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे प्रशिक्षक
ऑस्ट्रेलियन पुरूष क्रिकेट संघाचे (Australian mens cricket team) मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून अँड्र्यू मॅकडोनाल्ड (Andrew McDonald) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा करार 4 वर्षाचा असणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी सांगितले की जस्टिन लँगर (Justin Langer) यांनी छोट्या कालावधीसाठी आपला करार वाढवून घेण्यास नकार दिल्यानंतर मॅकडोनाल्ड यांची अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मात्र आता त्यांचा करार वाढवण्यात आला आहे. (Andrew McDonald named head coach of the Australian men's cricket team)
हेही वाचा: कॅप्टन जडेजाने पहिला विजय धोनी नाही तर 'या' व्यक्तीला केला समर्पित
दरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती झाल्यानंतर अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी 'माझा आतापर्यंतचा प्रवास सुखद होता. मला आनंद वाटतोय की मला या पदावर दीर्घ काळ काम करण्याची संधी मिळाली.' ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानातील ऐतिहासिक कसोटी मालिका 1-0 अशी जिंकल्यानंतर मॅकडोनाल्ड यांची पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हेही वाचा: VIDEO : पदार्पणात सुयशची चपळाई; मोईन अलीनं गोंधळून फेकली विकेट
मॅकडोनाल्ड यांनी 2109 मध्ये ऑस्ट्रेलियन कोचिंग टीममध्ये सामील झाले होते. त्यांनी व्हिक्टोरिया स्टेट आणि मेलबर्न रेनेगेड्स या संघांना तीनही देशांतर्गत स्पर्धांमध्ये विजेतेपद (2018 - 19) मिळून दिले होते. अँड्र्यू मॅकडोनाल्ड हे एक माजी अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांनी आयपीएल आणि इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये देखील प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ते जस्टिन लँगर यांच्यासोबत वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियन संघाशी जोडले गेले होते.
Web Title: Andrew Mcdonald Named Head Coach Of The Australian Mens Cricket Team
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..