हे फक्त एक वाईट स्वप्न असावं... सायमंड्सची शेवटची इन्स्टा पोस्ट होतीय व्हायरल |Andrew Symonds's last Instagram post was on Warne | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andrew Symonds's last Instagram post was on Warne
हे फक्त एक वाईट स्वप्न असावं... सायमंड्सची शेवटची इन्स्टा पोस्ट होतीय व्हायरल

'हे फक्त एक वाईट स्वप्न असावं...'सायमंड्सची शेवटची इन्स्टा पोस्ट होतीय व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा (Australia) ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सायमंड्सचं वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं आहे. त्याच्या या मृत्यूनंतर त्याची अखेरची इस्टाग्रामवरील पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याने दिवंगत ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर शेन वॉर्नसोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. त्याच्यासाठी त्याने इमोशनल पोस्ट लिहीली होती.

हेही वाचा: IPL च्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष

मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वॉर्न यांचं निधन झालं. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली. त्यावेळी जगभरातून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच्या मृत्यूच्या दोन महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी एका दिग्गजाला गमावलं आहे. अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे.

वॉर्नच्या मृत्यूनंतर सायमंड्सने त्याच्यासाठी खास पोस्ट केली होती. जी सध्या त्याच्या मृत्यूनंतर व्हायरल होत आहे. उद्ध्वस्त झालं सर्व, मला आशा आहे की हे सर्व एक वाईट स्वप्न आहे, कदाचित मी तुम्हाला पुन्हा कधीही पाहू शकणार नाही. वॉर्न कुटुंबावरील प्रेमामुळे मी अवाक आहे." अशी इमोशनल पोस्ट शेअर करत त्याने वॉर्नसोबतच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा: 20 व्या वर्षी 20 षटकार; मात्र व्यसनामुळे मातीमोल झाली क्रिकेट कारकिर्द

त्याची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. कारण वॉर्नच्या मृत्यूनंतर सायमंड्सने इंस्टावर एकही पोस्ट केलेली नाही. त्याची लास्ट पोस्टही वॉर्नच्या मृत्यूबाबत आहे.

अवघं क्रिकेट जग सायमंड्सच्या मृत्यूने हळहळत आहे. त्याच्या कारचा भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर मृत्यू झालेल्या अँड्यूने वयाच्या 46 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Web Title: Andrew Symondss Last Instagram Post Was On Warne

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top