
IPL च्या मानधनाने कालवलं जीवलग दिग्गजांच्या मैत्रीत विष
क्रिकेट जगताला सकाळी सकाळी धक्का देणारी बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यासंदर्भात मैदानातील अनेक गोष्टींना उजाळा देण्यात येत आहे. विशेष म्हणजे त्याचा जिवलग मित्र ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) त्याच्यासोबतचे नातं आणि आयपीएलच्या मानधनामुळे तुटलेली मैत्री.
एँड्र्यू सायमंड्स (Andrew Symonds) आणि मायकल क्लार्क (Michael Clarke) यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळले. दोघांचे एकमांसोबत चांगली मैत्री होती. परंतु, सायमंड्सच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात क्लार्कसोबत त्याचे संबंध बिघडले. आयपीएल २००८ (IPL 2008) मध्ये सायमंड्स दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. डेक्कन चार्जर्सने त्याला आयपीएलच्या या पहिल्या हंगामात मोठी रक्कम खर्च करून विकत घेतले होते. सायमंड्सच्या मते याच कारणास्तव क्लार्क त्याच्यावर जळू लागला होता.
हेही वाचा: Andrew Symonds : क्रिकेट जगताला हादरवून सोडणारा 'मंकी गेट' कांड
खुद्द सायमंड्सने ब्रेट लीच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला आहे. सायमंड्स या पॉडकास्टमध्ये म्हणाला की, 'ज्यावेळी क्लार्क संघात आला होता. त्यावेळी आम्ही दोघे एकत्रच फलंदाजी करत होतो. मी त्याची खूप काळजी घेत होतो. आम्ही चांगले मित्र झालो होतो. मला आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) त्यावेळेची सर्वात मोठी रक्कम मिळाली होती. यानंतर माझ्या आणि क्लार्कच्या मैत्रीला तडे गेले. याची कल्पना मॅथ्यू हेडनला होती. पैसा खूप काही करवतो. पैसा चांगला आहे मात्र कधी कधी पैसा विष देखील बनते. मला वाटते की पैशामुळेच आमच्या दोघांच्या नात्यात फूट पडली.'
सायमंड्स पुढे म्हणाला की, 'माझ्या मनात त्याच्याविषयी खूप आदर आहे. त्यामुळे मी फार काही बोलणार नाही. आता आम्ही दोघे मित्र नाही. मला याबाबत काहीच अडचण नाही. मात्र मी इथे बसून चिखलफेक करणार नाही.'
हेही वाचा: 20 व्या वर्षी 20 षटकार; मात्र व्यसनामुळे मातीमोल झाली क्रिकेट कारकिर्द
मायकल क्लार्कने देखील सायमंडवर बरेच आरोप केले होते. कर्णधार असताना क्लार्कने 2008 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर असताना सायमंड्सला अर्ध्यातून मायदेशी परत पाठवले होते. कारण सायमंड्स टीम मिटिंग सोडून मासेमारी करण्यासाठी गेला होता. ही गोष्ट त्याने 2015 च्या अॅशेस डायरीमध्ये क्लार्कने लिहिली आहे. क्लार्क म्हणतो 'सायमंड्सने टीव्हीवर माझ्या नेतृत्वावर खूप टीका केली होती. त्याला कोणाच्या नेतृत्वावर टीका करण्याचा अधिकार नाही. तो असा खेळाडू आहे जो 2005 मध्ये नशेत असताना आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी आला होता.'
Web Title: Andrew Symmonds Says Ipl Money As Prime Reason Behind His Fallout With Michael Clarke
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..