Matheesha Pathirana : धोनीचा "हुकमी एक्का" वर्ल्ड कपमधून बाहेर, माजी कर्णधाराला मिळाली एंट्री

Angelo Mathews to replace Matheesha Pathirana in Sri Lanka World Cup
Angelo Mathews to replace Matheesha Pathirana in Sri Lanka World Cupsakal

Angelo Mathews to replace Matheesha Pathirana in Sri Lanka World Cup : वर्ल्ड कप 2023 दरम्यान श्रीलंकेच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाच्या जागी माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा समावेश केला आहे.

10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर पाथिरानाने आपल्या खांद्याबद्दल तक्रार केली होती, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्धच्या पुढील सामन्यांमध्ये तो खेळला नाही.

Angelo Mathews to replace Matheesha Pathirana in Sri Lanka World Cup
India vs Pakistan : 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये अजूनही खेळला जाऊ शकतो भारत अन् पाकिस्तान, जाणून घ्या समीकरण

आता पाथिरानाच्या बदलीची घोषणा करण्यात आली आहे. 20 वर्षीय पाथिरानाने स्पर्धेत 2 सामने खेळले, ज्यामध्ये तो खूप महागडे ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 90 धावा आणि पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 95 धावा दिल्या.

मात्र, दोन्ही सामन्यांत त्याने 1-1 असे यश संपादन केले. धोनीच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या पाथिरानाला वर्ल्ड कपमध्ये आपली छाप पाडता आली नाही.

Angelo Mathews to replace Matheesha Pathirana in Sri Lanka World Cup
VIDEO: पाकिस्तानला हरवल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी 'लुंगी डान्स' गाण्यावर बसमध्ये केला भांगडा

अँजेलो मॅथ्यूजबद्दल सांगायचे तर, तो संघाचा अनुभवी खेळाडू आहे आणि संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो. अष्टपैलू मॅथ्यूज वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेसाठी प्रभावी ठरू शकतो. या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने खेळलेल्या श्रीलंकेच्या संघाला 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

पहिल्या तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर चौथ्या सामन्यात संघाला विजय मिळाला. श्रीलंकेचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 102 धावांनी, दुसरा पाकिस्तानविरुद्ध 6 विकेटने आणि तिसरा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेटने हरला. मात्र, यानंतर संघाने नेदरलँड्सविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 5 विकेट्स राखून विजय मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com