
David Warner : स्मिथ कर्णधार होताच डेव्हिड वॉर्नरने घेतला मोठा निर्णय; लांबलचक पोस्ट करत म्हणाला...
David Warner : बॉल टॅम्परिंग प्रकरणात एका वर्षाची बंदी भोगलेल्या स्टीव्ह स्मिथच्या गळ्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाची माळ पडली. त्यामुळे आता डेव्हिड वॉर्नरच्या कॅप्टन्सीवर लागलेला बॅन देखील हटवण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र डेव्हिड वॉर्नरने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्याने कॅप्टन्सीवरील बॅनविरूद्ध दाखल केलेला आपला अर्ज मागे घेतला आहे. त्याने या प्रकरणावर सार्वजिनिकरित्या सुनावणी घेण्यास विरोध केला. याबाबत त्याने इन्स्टाग्राम पोस्ट लिहित आपली नाराजी व्यक्त केली.
डेव्हिड वॉर्नरवर स्टीव्ह स्मिथ सोबतच बॅन लागला होता. मात्र आता वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथला कर्णधार करण्यात आले आहे. यानंतर वॉर्नरने बुधवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली. यात त्याने बॅनच्या निर्णयाबाबत स्थापन केलेल्या रिव्ह्यू पॅनलवर सार्वजनिकरित्या त्याचा अपमान केल्याचा आरोप केला. आपल्या मोठ्या पोस्टमध्ये वॉर्नरने काही गोष्टी क्रिकेटपेक्षाही महत्वाच्या असतात. त्याने आपली कुटुंबाला अधिक प्राथमिकता असल्याचे सांगितले.
हेही वाचा: Umran Malik : उमरान मलिकमुळे बांगलादेशमध्ये भीतीचे वातावरण! एक बोल्ड अन् दुसरा...
डेव्हिड वॉर्नर आपल्या पोस्टमध्ये म्हणतो की, बॉल टॅम्परिंग प्रकरणी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप काही सहन करावं लागलं. हा अनुभव खूप भीतीदायक होता. बोर्डाने आठवडाभर माझा अर्ज आपल्याजवळ ठेवला. त्यानंतर त्यावर लक्ष न देण्याचा निर्णय घेतला. यावरून मॅनेजमेंटला माझा जाहीर अपमान करण्यातच रस असल्याचे दिसते.
हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?