Anil Kumble : कुंबळेने लाजीरवाण्या पराभवानंतर BCCI ला 'लीग क्रिकेट'बाबत दिला सल्ला

Anil Kumble T20 League
Anil Kumble T20 League esakal

Anil Kumble T20 League : भारताला 2013 पासून एकाही आयसीसी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेत संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवतोय. मात्र त्याला आयसीसी स्पर्धेत आपल्या लौकिकास साजेसा खेळ करण्यात सातत्याने अपयश येत आहे. याबाबत सध्या माध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, जर वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणाऱ्या 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये जर भारतीय संघाला विजेतेपद मिळवायचं असेल तर काय करायला हव याबाबत भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने बीसीसीआयला सल्ला दिला आहे.

Anil Kumble T20 League
T20 World Cup 2022 : 'मालिकावीर'साठी विराट अन् सूर्यकुमारमध्ये असणार चुरस

भारताने 2008 मध्ये आयपीएलची सुरूवात केल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्या त्यांच्या देशात टी 20 लीग स्पर्धा सुरू केल्या आहेत. यात ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, पाकिस्तानमधील पाकिस्तान प्रीमियर लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग अशा काही लीगचा समावेश आहे. पाकिस्तानचा अपवाद वगळता बीसीसीआय आयपीएलमध्ये इतर देशाच्या खेळाडूंचे स्वागत करते. मात्र भारतीय खेळाडूंना इतर देशातील लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी देत नाही. यावरच आक्षेप घेत अनिल कुंबळेने बीसीसीआयला सल्ला दिला.

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना अनिल कुंबळे म्हणाला की, 'मला वाटते की इतर लीगचा अनुभव नक्कीच मदत करेल. आपण आयपीएलवरूनच उदाहरण घेऊ शकतो विदेशी खेळाडू भारतीय खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे भारतातील युवा खेळाडूंना त्याचा फायदाच झाला आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना परदेशी टी 20 लीगमध्ये खेळण्याची संधी देण्यास काय हरकत आहे?'

Anil Kumble T20 League
Shaheen Afridi : वसिम अक्रमसारखा शाहीन आफ्रिदी देखील इतिहास घडवणार?

कुंबळे पुढे म्हणाला की, 'तुम्हाला 2024 चा टी 20 वर्ल्डकप जिंकायचा असेल तर तुम्हाला जे काही गरजेचे आहे ते सगळं करावं लागेल. तुम्ही वर्ल्डकप स्पर्धेला जाताना पूर्णपणे तयार असला पाहिजे.' भारताच्या टी 20 वर्ल्डकप संघातील काही खेळाडूंना ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव नव्हता.

दुसरीकडे जॉस बटलर, अॅलेक्स हेल्स आणि इतर विदेशी खेळाडूंना बीबीएलचा तगडा अनुभव होता. त्यांनी भारताला 10 विकेट्सनी पराभूत केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com