T20 World Cup 2022 : 'मालिकावीर'साठी विराट अन् सूर्यकुमारमध्ये असणार चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2022 Player of the Tournament

T20 World Cup 2022 : 'मालिकावीर'साठी विराट अन् सूर्यकुमारमध्ये असणार चुरस

T20 World Cup 2022 Player of the Tournament : आयसीसीने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमधील मालिकावीर पुरस्कारासाठी 9 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. आज (दि.11) शुक्रवारी आयसीसीने ही 9 खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत भारताच्या विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांची नावे देखील आहे. दोघांनीही यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये दमदार फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. दरम्यान, रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड याच्यांतील अंतिम सामन्यानंतर या पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे.

हेही वाचा: Shaheen Afridi : वसिम अक्रमसारखा शाहीन आफ्रिदी देखील इतिहास घडवणार?

मालिकावीराच्या पुरस्कारासाठी इंग्लंड संघातून 3, पाकिस्तान संघातून 2 तर श्रीलंका आणि झिम्बाब्वे संघातून प्रत्येकी एका खेळाडूची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. याचबरोबर भारताच्या दोन नावांचा देखील समावेश आहे. विराट कोहलीने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत 296 धावा केल्या आहेत. त्याने या धावा 98.66 च्या सरासरीने ठोकल्या आहेत. तर त्याचा स्ट्राईक रेट हा 136.40 इतका होता. तो सध्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने या टी 20 वर्ल्डकपमध्ये सहा सामन्या 4 अर्धशतकी खेळी केली आहेत. यात पाकिस्तानविरूद्धची 82 धावांची धुवांधार खेळी सर्वोत्तम होती.

हेही वाचा: Gautam Gambhir : रोहितपेक्षा जास्त द्विशतकं अन् विराटपेक्षा जास्त शतकं कराल हो, पण... गंभीरने केली धोनीची स्तुती

भारताच्या सूर्यकुमार यादवने देखील आपल्या चौफेर फटकेबाजीने क्रिकेट रसिकांची मने जिंकली. त्याने स्पर्धेत सहा सामन्यात 239 धावा केल्या आहेत. त्याचा स्पर्धेतील स्ट्राईक रेट हा 189.68 इतका दमदार आहे. याचबरोबर त्याने स्पर्धेत तीन अर्धशतकी खेळी देखील केल्या. त्याने झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडविरूद्ध अर्धशतक खेळी केली. सूर्यकुमार यादवने टी 20 आयसीसी रँकिंगमध्ये देखील आपला दबदबा कायम ठेवत अव्वल स्थान पटकावले.