अंजुम विश्‍वविक्रमापेक्षा सरस कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

जागतिक क्रमवारीत आठवी असलेल्या अंजुम मौदगिलने सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने या वेळी जागतिक विक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. 

मुंबई: जागतिक क्रमवारीत आठवी असलेल्या अंजुम मौदगिलने सरदार सज्जन सिंग सेठी स्मृती मास्टर्स नेमबाजी स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तिने या वेळी जागतिक विक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत देशातील अव्वल 15 नेमबाजांना एलिट गटात प्रवेश दिला जातो. ऑलिंपिक पात्रता यापूर्वीच मिळवलेल्या अंजुमने अंतिम फेरीत 253.9 गुणांचा वेध घेताना जागतिक विक्रमापेक्षा सरस कामगिरी केली. तिने अपूर्वी चंडेलाचा 252.9 गुणांच्या जागतिक विक्रमापेक्षा एक गुण जास्त मिळवला. रौप्यपदक विजेती मेहुली घोष जागतिक विक्रमाच्या बरोबरीपासून 0.7 गुणांनी दूर राहिली. तिने कुमारी गटात अव्वल क्रमांक मिळवला. एलावेनिल वालारिवान ही 252.4 गुणांसह कुमारी गटात दुसरी आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anjum scored more than world cup record