Faruk Koca Punched The Referee : 96 व्या मिनिटाचा तो गोल अन् ठोसेबाजी! पंचालाच हाणला नॉक आऊट 'पंच'

Faruk Koca Punched The Referee
Faruk Koca Punched The Refereeesakal

Faruk Koca Punched The Referee : तुर्की फुटबॉल लीगमध्ये एक एजब आणि धक्कादायक प्रकार घडला. अंकारागुजू फुटबॉल क्लबचे अध्यक्ष फारकू कोका यांनी पंचांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावला. या ठोशामुळे पंच जमिनीवर कोसळले. ही घटाना अकारागुजू विरूद्ध रिझेस्पोर या सामन्यादरम्यान घडली. हा सामना 1 - 1 असा बरोबरीत सुटला.

Faruk Koca Punched The Referee
SA vs IND 2nd T20I LIVE : मालिकेवरच पावसाचं मळभ; दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली

तुर्की फुटबॉल लीग या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत अंकारागुजू फुटबॉल क्लबचे अध्यक्ष फारकू कोका यांनी पंच हलिल उमुत मेलेर यांच्या चेहऱ्यावर जोरदार ठोसा लगावण्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा ठोसा इतका जोरदार होता की पंच मैदानावरच कोसळले.

त्याचं झालं असं की पंच हलिल यांनी 96 व्या मिनिटाला कायकूर रिझेसपोरने अंकारागुजूवर गोल केला. याचबरोबर सामना 1 - 1 असा बरोबरीत सुटला. त्यानंतर अंकारागुजूचे अध्यक्ष फारकू हे तावातावाने मैदानात आले अन् त्यांनी पंच हलिल यांना ठोसाच लगावला.

अंकारागुजूचे चाहते देखील मैदानात शिरले होते. हलिल हे मैदानावर कोसळले असताना त्यांना लाथा देखील मारल्या गेल्या. अखेर पोलिसांच्या मदतीने पंच हलिल यांना ड्रेसिंग रूमपर्यंत नेण्यात आलं.

Faruk Koca Punched The Referee
Reliance-Disney Merger : रिलायन्स - डिज्ने एकत्र येणार, भारतातील स्ट्रीमिंग मार्केटवर अधिराज्य गाजवणार?

तुर्कीच्या फुटबॉल फेडरेशनने यानंतर ट्विट केलं की, 'तुक्रीच्या फुटबॉल फेडरेशनने या घटनेनंतर लीगमधील सर्व सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबधीत क्लब, क्लबचे संचालक, अधिकारी आणि पंचाना मारहाणीत जे कोणी दोषी आहेत त्यांना अत्यंत कडक शिक्षा करण्यात येणार आहे.'

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com