ब्रिटनच्या हॅरिएटसह अंकिता रैना विजेती 

वृत्तसंस्था
Sunday, 13 May 2018

अंकिताचे हे कारकिर्दीत दुहेरीतील 13 वे व मोसमातील पहिलेच विजेतेपद आहे. यंदा तिने ग्वाल्हेरला एकेरीत जेतेपद मिळविले होते. अंकिताने सांगितले की, "हॅरिएटचा स्वभाव फार हलकाफुलका आहे. ती अजिबात दडपण घेत नाही. ब्रेकपॉइंटच्या वेळीसुद्धा खेळाचा आनंद लुटायचा, असा तिचा दृष्टिकोन असतो.

लुआन (चीन) - भारताच्या अंकिता रैनाने ब्रिटनच्या हॅरिएट डार्ट हिच्या साथीत आयटीएफ टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद मिळविले. त्यांना तिसरे मानांकन होते. अंतिम फेरीत त्यांनी चीनच्या फॅंगझू लिऊ-फॅंग यिंग झून यांना 6-3, 6-3 असे हरविले. सामना एक तास सहा मिनिटे चालला. अंकिता-हॅरिएटने 13 पैकी सहा ब्रेकपॉइंट जिंकले.

अंकिताचे हे कारकिर्दीत दुहेरीतील 13 वे व मोसमातील पहिलेच विजेतेपद आहे. यंदा तिने ग्वाल्हेरला एकेरीत जेतेपद मिळविले होते. अंकिताने सांगितले की, "हॅरिएटचा स्वभाव फार हलकाफुलका आहे. ती अजिबात दडपण घेत नाही. ब्रेकपॉइंटच्या वेळीसुद्धा खेळाचा आनंद लुटायचा, असा तिचा दृष्टिकोन असतो. या यशाचा आनंद कसा साजरा करायचा हे अजून ठरविलेले नाही. मी बरेच दिवस परदेशातील स्पर्धांत खेळते आहे. आता पुण्यात परत येण्यास उत्सूक आहे. हॅरिएटचीसुद्धा हीच भावना आहे.' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita Raina winners with Britain's Harriet