'या' दिग्गज क्रिकेटपटूची पत्नी पडद्यावर साकारणार झूलन गोस्वामी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जानेवारी 2020

झूलनने 2018मध्ये ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट घेण्याचा बहुमान मिळविणारी ती 2018मध्ये पहिली खेळाडू ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2002मध्ये पदार्पण केलेल्या झूलनने आतापर्यंत 182 सामन्यांमध्ये 225 विकेट घेतल्या आहेत. 

मुंबई :बॉलिवूडमध्ये सध्या क्रिकेटपटूंवर  बायोपिक करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. मिताली राज, कपिल देव यांच्यावर चित्रपट येत असतानाच आता भारतीय क्रिकेटमधील आणखी एका महान खेळाडूवर चित्रपट येणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीच्या आयुष्यावर बायोपिक येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा झूलनचा रोल करणार आहे. 

झूलनने 2018मध्ये ट्वेंटी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट घेण्याचा बहुमान मिळविणारी ती 2018मध्ये पहिली खेळाडू ठरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2002मध्ये पदार्पण केलेल्या झूलनने आतापर्यंत 182 सामन्यांमध्ये 225 विकेट घेतल्या आहेत. 

बॉलिवूडमध्ये यापूर्वी एम एस धोनी, महंमद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर यांच्यावर चित्रपट तयार केले होते. या चित्रपटांना तुफान प्रसिद्धी मिळाली होती. सध्या कपिल देवांवर असलेला 83 हा चित्रपट येऊ ठाकला आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावरही चित्रपट येणार असून यात तापसी पन्नू काम करणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma To Play Lead Role In Jhulan Goswamis Biopic