अनुष्काने सांगितली विराटबद्दल गुपितं

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी नेहमीच उघडपणे आपल्या प्रेमाचे दाखले दिले आहे. तिने नुकतेच फिल्मफेअरशी बोलताना विराटसह असलेल्या नात्याबद्दल काही गुपितं सांगितली. 

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी नेहमीच उघडपणे आपल्या प्रेमाचे दाखले दिले आहे. तिने नुकतेच फिल्मफेअरशी बोलताना विराटसह असलेल्या नात्याबद्दल काही गुपितं सांगितली. 

''मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी लग्न केलं आहे. तो माझी सगळी गुपितं राखतो. तो ज्या प्रकारचा माणूस आहे त्यावर माझे नितांत प्रेम आहे. साऱ्या जगात जेव्हा तुम्हाला सर्वजण चुकीचे वागवत असतात तेव्हा असा एक माणूस येतो जो तुम्हाला सर्व परिस्थितींमध्ये सांभाळून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला जगाची पर्वा करण्याची गरज नसते. आम्ही दोघे जेव्हा जेव्हा एकत्र असतो मला जगाची पर्वा नसते,'' असे मत तिने व्यक्त केले आहे. 

ते दोघे जेव्हा एकमेकांना डेट करत होते तेव्हाही आमचे तसेच होते जसे आता लग्न झाल्यावर आहे. विराटमध्ये अनुष्काला तिचे सारे कुटुंब मिळाल्याचा आनंद होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma shares sweetest things about husband Virat Kohli