ISSF 2025: भारताच्या अनुष्काची सुवर्णपदकावर मोहर; ज्युनियर विश्वकरंडक नेमबाजी, पुरुषांच्या विभागात ॲड्रियनला रौप्यपदक
Anushka Thokur: अनुष्का ठोकूर हिने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावले तर ॲड्रियन कर्माकर याने रौप्यपदक जिंकले.या दोन्ही खेळाडूंमुळे भारताची एकूण पदकसंख्या १३ वर पोहोचली आहे.
नवी दिल्ली : अनुष्का ठोकूर हिने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत ज्युनियर विश्वकरंडक नेमबाजी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावले. पुरुष विभागात ॲड्रियन कर्माकर याने रौप्यपदकाची कमाई केली.