

U9 Chess World No1
sakal
पारगाव : अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव येथील अन्वी दीपक हिंगे या अवघ्या आठ वर्षांच्या बुद्धिबळपटूने जागतिक स्तरावर इतिहास रचत फिडे नऊ वर्षांखालील मुलींच्या गटात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले आहे.अन्वी ही जगातील सर्वात लहान वयाची महिला कॅंडिडेट मास्टर (डब्ल्यूसीएम) ठरली असून नऊ वर्षांखालील वयोगटातील जगातील एकमेव डब्ल्यूसीएम बनली आहे.