कोलंबिया एअरलाईन्सविरुद्ध तिरंदाजी संघटना दाूबवा करणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

 विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धा सहभागापासून भारतीयांना दूर ठेवलेल्या केएलएम एअरलाईन्सविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करण्याची शक्‍यता असल्याचे संकेत भारतीय तिरंदाजी संघटनेने दिले आहेत

मुंबई : विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धा सहभागापासून भारतीयांना दूर ठेवलेल्या केएलएम एअरलाईन्सविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करण्याची शक्‍यता असल्याचे संकेत भारतीय तिरंदाजी संघटनेने दिले आहेत. 

कोलंबियात आजपासून सुरू होणाऱ्या विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी रवाना होणार होता, पण दिल्ली ऍमस्टरडॅम विमानास उशीर झाला आणि त्यानंतर ऍमस्टरडॅम-बोगोटा-कोलंबियाचे विमान चुकेल असे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर ऍमस्टरडॅम कोलंबिया विमानात तुम्हाला जागाही मिळणार नाही, असेही भारतीय तिरंदाजांना सांगण्यात आले होते. 

इस्टर वीक असूनही भारतीय तिरंदाजी संघटना तसेच स्पोर्टस इंडिया अधिकाऱ्यांनी तिकीट आरक्षित केले होते. आता तिकीट आरक्षित असताना भारतीय संघास स्पर्धेच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी केएलएमची होती. त्याची पूर्तता न केल्याबद्दल त्यांच्याकडून नुकसान भरपाई मागण्याचा संघटनेचा विचार आहे. 

तिरंदाजी संघ विश्‍वकरंडक स्पर्धेस न गेल्यामुळे संघटनेचे अध्यक्ष बी व्ही पी राव अकार्यक्षम असल्याची टिप्पणी भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी केली होती. अध्यक्ष त्यांच्याविरुद्ध फौजदारी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. 
- तिरंदाजी संघटनेच्या पत्रकातून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Archery Association of India to sue colombia Airlines