APL 2026: Asian Games मध्ये पदकांची लूट करणारे भारतीय तिरंदाज पुन्हा सज्ज! कधी अन् कुठे पाहाता येणार भारतीय तिरंदाज

Archery Premier League (APL) 2026 Dates and Teams : आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशानंतर आता भारतीय तिरंदाज आर्चरी प्रीमियर लीगसाठी सज्ज झाले आहेत. ही स्पर्धा ८ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा कुठे पाहाता येईल जाणून घ्या.
Archery Premier League (APL)

Kumkum Mohod | APL 2026

Sakal

Updated on: 

Archery Premier League (APL) 2026 Marathi Updates: आशियाई क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर भारतीय तिरंदाज पुन्हा एकदा जागतिक मंचावर आपला दबदबा दाखवण्यास सज्ज झाले आहेत. पण, यावेळी ते एकमेकांसोबत नव्हे, तर एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत पाच सुवर्णपदकांसह नऊ पदके जिंकल्यानंतर, भारतीय तिरंदाज ८ ऑक्टोबर रोजी हैदराबादमध्ये सुरू होणाऱ्या आर्चरी प्रीमियर लीगच्या (APL) दुसऱ्या हंगामात खेळताना दिसणार आहेत.

१७ वर्षीय कुमकुम अनिल मोहोड रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये वैयक्तिक आशियाई क्रीडा सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली, तर ज्योती सुरेखा वेन्नमने भारताला महिला सांघिक सुवर्णपदक राखण्यास मदत केली आणि साहिल राजेश जाधवने दोन सुवर्णपदके जिंकली. हैदराबादमध्ये, हाच फॉर्म वेगवेगळ्या फ्रँचायझी संघांमध्ये कायम ठेवतील, अशी अपेक्षा असून जगातील काही आघाडीच्या तिरंदाजांसोबत व त्यांच्याविरुद्ध स्पर्धा करतील.

Archery Premier League (APL)
Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com