Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

INDIA'S 85-MEDAL FINISH AT ASIAN GAMES 2026: आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेचा ८५ मेडल्ससह भारताने शेवट केला. अखेरच्या दिवशी कुमकुम मोहोड, अमन सेहरावत, प्रणवी उर्स यांनी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले, तर भारताच्या पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघांनीही सुवर्णकामगिरी केली.
India at Asian Games 2026

India at Asian Games 2026

Sakal

Updated on: 

जपानमध्ये आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसाठी शनिवार (३ ऑक्टोबर) शेवटचा दिवस होता. पण शेवटचा दिवसही भारतीय खेळाडूंनी गाजवत ५ सुवर्णपदके जिंकली. याशिवाय एकूण १० पदके भारतीय खेळाडूंनी शनिवारी जिंकली. भारतासाठी शनिवारी तिरंदाजीत कुमकुम मोहोडने, कुस्तीमध्ये अमन सेहरावतने आणि गोल्फमध्ये प्रणवी उर्सने सुवर्णपदक जिंकले, तर भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने आणि पुरुष हॉकी संघानेही सुवर्णपदक जिंकले.

यामुळे आता भारताच्या खात्यात १४ दिवसात ८५ पदके आली असून यात २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्य पदकांचा समावेश आहे. त्यामुळे भारत चौथ्या क्रमांकावर राहिला. भारताच्या पुढे चीन (३४१ पदके), जपान (२६९ पदके) आणि कोरिया (१५० पदके) आहेत.

India at Asian Games 2026
Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com