तिरंदाजी वर्ल्ड कप: नवरा-बायकोचा 'सुवर्ण' वेध; भारताला तिसरे गोल्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Deepika Kumari ant Atanu Das

तिरंदाजी वर्ल्ड कप: नवरा-बायकोचा 'सुवर्ण' वेध; भारताला तिसरे गोल्ड

Archery World Cup : फान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये सुरु असलेल्या तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत नवरा-बायकोच्या जोडीने भारताला तिसरे सुवर्ण मिळवून दिले. तिरंदाज अतनु दास (Atanu Das) आणि त्याची पत्नी दीपिका कुमारीने (Deepika Kumari) रविवार तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत मिश्र संघात सुवर्ण कामगिरी नोंदवली. भारतीय जोडीने फायनलमध्ये नेदरलंडच्या जेफ वान डेन बर्ग आणि गॅब्रिएला शोलेसर जोडीचा 5-3 असा पराभव केला. भारताचे या स्पर्धेतील हे तिससे सुवर्ण पदक आहे. (Archery World Cup Atanu Das Deepika Kumari Clinch Recurve Mixed Team Gold Medal)

यापूर्वी भारतीय महिला रिकर्व संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कोमलिका बारी या तिघींनी मिळून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. या तिघींनी तिसऱ्या फेरीतील फायनलमध्ये मॅक्सिकोविरुद्ध सोनेरी कामगिरी केली होती.

कंपाउंड तिरंदाजी क्रीडा प्रकारात (Compound Archery) भारताच्या अभिषेक वर्मा (Abhishek Verma) ने अमेरिकेच्या (USA) दिग्गज क्रिस शाफ (Kris Schaff) ला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती. शूटआफपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.