तिरंदाजी वर्ल्डकपमध्ये भारताच्या अभिषेक वर्माने रचला इतिहास

रंगतदार झालेल्या लढतीत विजय नोंदवत अभिषकने तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत (Archery World Cup) सुवर्ण पदक पटकावले.
abhishek verma
abhishek vermaTwitter

पॅरिस : कंपाउंड तिरंदाजी प्रकारात (Compound Archery) भारताच्या अभिषेक वर्मा (Abhishek Verma) ने अमेरिका (USA) च्या दिग्गज क्रिस शाफ (Kris Schaff) ला पराभूत करत नवा इतिहास रचला. शूटआफपर्यंत रंगतदार झालेल्या लढतीत विजय नोंदवत अभिषकने तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत (Archery World Cup) सुवर्ण पदक पटकावले.

काँटे की टक्कर आणि सुवर्ण वेध

बरोबरीच्या फायनल लढतीमध्ये अभिषेक वर्मा (Abhishek Verma) आणि क्रिस शाफ (Kris Schaff) दोन्ही तिरंदाजांनी 2-2 अंक गमावले. दोघांच्या खात्यात 148-148 गुण जमा झाले होते. जगातील पाचव्या क्रमांकावर असलेल्या शाफने 9 पासून शूटआफ सुरु केले. दुसरीकडे अभिषेक वर्माने परफेक्ट 10 अंकासह बाजी मारली. नेदरलँडचा माईक शोलोएसर (Mike Schloesser) तिसऱ्या स्थानावर राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com