
Argentina Coach Lionel Scaloni Message Lionel Messi : फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये अर्जेंटिनाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना गतविजेत्या फ्रान्ससोबत 18 डिसेंबरला होणार आहे. लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा वर्ल्डकप आहे. यानंतर मेस्सी अर्जेंटिनाच्या टी शर्टमध्ये पुन्हा कधी दिसणार नाही. याबाबचे संकेत त्याने स्वतः सेमी फायनलमध्ये क्रोएशियाला पराभूत केल्यानंतर दिले होते.
खरं तर जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या अर्जेंटिनाचा हा खेळाडू निवृत्तीच्या मानसिकतेत होता. चार वर्ल्डकप खेळले फायनलपर्यंत देखील पोहचलो मात्र वर्ल्डकप आपल्या नशिबातच नाही अशा मानसिकतेत मेस्सी होती. मात्र अर्जेंटिनाचे नवे प्रशिक्षक लिओनेल स्कलोनी यांनी मेस्सीला एकच संदेश पाठवला आणि अर्जेंटिनाच्या वर्ल्डकप मोहिमेचा नूरच पालटला.
वर्ल्डकपपूर्वी लिओनेल मेस्सी द्विधामनस्थितीत होता. तो म्हणाला की, 'मी ड्रेसिंग रूमध्ये याबाबत विचार करत होतो. आता बस झालं. राष्ट्रीय संघाकाडून खेळण्याचा चाप्टर माझ्यासाठी बंद झाला आहे. आतापर्यंत 4 फायनल्स झाल्या. दुर्दैवाने माझ्या पदरात काही पडलं नाही. मी आता हे करू शकत नाही. आता बस झालं.'
मात्र स्कलोनी अर्जेंटिनाचे प्रशिक्षक झाले. अनेक दिग्गजांना सोडून त्यांना प्रशिक्षक केल्याने अर्जेंटिनात टीका देखील झाली होती. याच स्कलोनी यांनी मेस्सीला व्हॉट्सअप मेसेज पाठवला. 'हाय लिओ मी स्कलोनी. माझ्यासोबत पाब्लो आहे. आम्हाला तुझ्यासोबत बोलायचे आहे.'
मेस्सी आणि स्कलोनी, पाब्लो हे मित्र असल्याने मेस्सीने देखील त्यांचा हा मेसेज टाळला नाही. त्यानंतर या सर्वांमध्ये फोनवरून बोलणे झाले. त्यानंतर मेस्सी अर्जेंटिना कडून शेवटचा वर्ल्डकप खेळण्यासाठी तयार झाली. स्कलोनी यांनी इएसपीएनशी बोलनाता सांगितले की, 'मेस्सीने सांगितले की तो संघात परतणार आहे. जर तुम्ही मला बोलवले तर मी नक्की अर्जेंटिनाकडून पुन्हा खेळेन. हे खूप सहाजिक होतं कारण अर्जेंटिनाविषयी त्याच्या मनात प्रेम आहे. म्हणूनच तुम्ही त्याला खेळताना पाहत आहात.'
मेस्सी आणि स्कलोनी यांचे पहिले टार्गेट हे कोपा अमेरिका होते. ते त्यांनी गेल्या वर्षी सर करून दाखवले. दुसरे वर्ल्डकप. आता ते वर्ल्डकपपासून फक्त एक सामना दूर आहेत. मेस्सीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 5 गोल मारले असून 3 असिस्ट देखील केले आहेत. तो गोल्डन बूटच्या रेसमध्ये एम्बाप्पेसोबत पहिल्या स्थानावर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.