
श्यमकेंट (कझाकस्तान): भारताच्या अर्जुन बाबुटा आणि इलावेनिल वालारिवन या जोडीने शनिवारी (ता. २३) १६व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक जिंकले. त्यांनी चीनच्या डिंगके लू आणि झिनलू पेंग यांना १७-११ अशा फरकाने पराभूत केले.