Syed Mushtaq Ali Trophy : 'गोवेकर' अर्जुन तेंडुलकरची बलाढ्य हैदराबादविरूद्ध दमदार कामगिरी

Arjun Tendulkar Syed Mushtaq Ali Trophy 2022
Arjun Tendulkar Syed Mushtaq Ali Trophy 2022 esakal

Arjun Tendulkar Syed Mushtaq Ali Trophy 2022 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याच्या कारकिर्दिसाठी चांगला ठरतोय असं दिसतंय. अर्जुन तेंडुलकरने सईद मुश्ताक अली टी 20 स्पर्धेत बलाढ्य समजल्या जाणाऱ्या हैदराबादविरूद्ध दमदार गोलंदजी केली. त्याने हैदराबादचा जवळपास निम्मा संघ एकट्याने गारद करत आपली कारकिर्दितील सर्वोत्त कामगिरी केली.

Arjun Tendulkar Syed Mushtaq Ali Trophy 2022
Hasin Jahan : मोहम्मद शमीच्या पत्नीसोबत ट्रेनमध्ये गैरवर्तन! तिकीट चेकर वर गंभीर आरोप

गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने हैदराबाद संघाविरूद्ध 4 षटकात फक्त 10 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. आपल्या स्पेलमधील एक षटक त्याने निर्धाव देखील टाकले. याचबरोबर अर्जुनने 4 विकेट्स देखील घेतल्या. यात हैदराबादचा स्टार फलंदाज आणि अर्जुनचा मुंबई इंडियन्समधील सहकारी तिलक वर्माचा देखील समावेश आहे. तिलक वर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याच्याच जोरावर हैदराबादने 20 षटकात 6 बाद 177 धावा केल्या.

अर्जुन तेंडुलकरने आपल्या स्पेलच्या पहिल्या षटकात फक्त 1 धाव दिली होती. त्यानंतर त्याने तिसरे षटक निर्धाव टाकले. अर्जुनने स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या. अर्जुनने तिलक वर्मा, प्रतीक रेड्डी, बुद्धी राहुल आणि टी रवी तेजा यांची शिकार केली. अर्जुनने आपल्या स्पेलमधील 17 चेंडू निर्धाव टाकले. त्याने तिलक वर्मा आणि प्रतीकला आपले हात खोलण्याची संधी दिली नाही.

Arjun Tendulkar Syed Mushtaq Ali Trophy 2022
Michael Hussey : विराट अन् बाबर पेक्षाही भारी! हसीने केले इंग्लंडच्या 'या' फलंदाजाचे तोंडभरून कौतुक

अर्जुन तेंडुलकरला सईद मुश्ताक अली ट्रॉफीतील आपल्या पहिल्या सामन्यात विकेट घेण्यात यश आले नव्हते. मात्र पुढच्या दोन सामन्यात त्याने मणिपूरविरूद्ध 20 धावात 2 आणि हैदराबादविरूद्ध 10 धावात 4 विकेट्स घेतल्या. गोवा विरूद्ध हैदराबाद सामन्यात हैदराबादचा कर्णधार तन्मय अगरवालने 41 चेंडूत 55 तर तिलक वर्माने 46 चेंडूत 62 धावांची खेळी केली. हैदराबादचे 177 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या गोव्याचा संघ 140 धावात तंबूत परतला. हैदराबादने 37 धावांनी सामना जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com