Arjun Tendulkar: अर्जुननं ठोकलं शतक! आता तरी मुंबई इंडियन्स चूक सुधारणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Tendulkar IPL 2023

Arjun Tendulkar: अर्जुननं ठोकलं शतक! आता तरी मुंबई इंडियन्स चूक सुधारणार का?

Arjun Tendulkar IPL 2023 : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला रणजी ट्रॉफी 2022 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. अर्जुनने 13 डिसेंबरला गोवा संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अर्जुनने ही संधी सुवर्ण संधी म्हणून घेतली आणि दुसऱ्या दिवशी त्याने शानदार शतक ठोकलं. त्याच वेळी इंडियन प्रीमियर लीगचा 16 वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. रणजी ट्रॉफीतील कामगिरी पाहून आगामी आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळताणा दिसणार का ?

हेही वाचा: Virat Kohli : विराट भावा मानलं! खेळाप्रती समर्पण असावं तर विराट सारखं, Photo होतोय व्हायरल

अर्जुन तेंडुलकर यापूर्वी मुंबई संघाचा भाग होता. मात्र मुंबईकडून त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे बदलीसाठी अपील केले. आता मुंबई सोडून अर्जुन गोव्याच्या संघात खेळत आहे. गोव्याविरुद्ध राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध पहिल्या डावात 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली.

हेही वाचा: Arjun Tendulkar: रणजी पदार्पणातच अर्जुन तेंडुलकरने केला धमाका; ठोकले धडाकेबाज अर्धशतक

अर्जुन 2020 पासून मुंबई इंडियन्सचा एक भाग आहे. पहिल्या सत्रात तो 20 लाखांच्या मूळ किंमतीसह संघात सामील झाला होता. त्याच वेळी दुसऱ्यांदा त्याला मुंबईने 30 लाख रुपयांमध्ये आपल्या कॅम्पमध्ये समाविष्ट केले. मात्र आतापर्यंत मुंबईने त्याला खेळण्याची संधी दिली नाही. मात्र त्याची गोव्यातील कामगिरी पाहून आगामी आयपीएलमध्ये त्याला मैदानात उतरवले जाऊ शकते, असे म्हणता येईल. 15 नोव्हेंबर रोजी फ्रेंचायझीने जाहीर केलेल्या यादीत या खेळाडूला कायम ठेवण्याचा निर्णय मुंबईने घेतला होता.