Prithvi Shaw Arjun Tendulkar : मित्रा तू फक्त.... नाराज झालेल्या पृथ्वी शॉसाठी अर्जुन तेंडुलकर आला धावून

Prithvi Shaw Arjun Tendulkar
Prithvi Shaw Arjun Tendulkar esakal

Prithvi Shaw Arjun Tendulkar : भारताचा आक्रमक शैलीचा सलामीवीर पृथ्वी शॉने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काऊन्टी वनडे स्पर्धेत एक द्विशतकी आणि एक शतकी खेळी करत मोठा धमाका केला होता. भारतीय संघात परतण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या पृथ्वीच्या या कामगिरीमुळे तो चर्चेत आला होता.

मात्र याच स्पर्धेत त्याला फिल्डिंग करताना दुखापत झाली अन् तो संपूर्ण स्पर्धेलाच मुकला. त्यामुळे भारतीय संघात परतण्यासाठी धडपडणाऱ्या पृथ्वीला मोठा धक्का बसला आहे. आता त्याला जवळपास 2 महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे.

मात्र निराश झालेल्या पृथ्वीसाठी त्याता दोस्त अर्जुन तेंडुलकर धावून आला. त्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला.

Prithvi Shaw Arjun Tendulkar
FIFA Women's World Cup 2023 : स्पेनने इंग्लंडचा इतिहास रचला; फिफा महिला वर्ल्डकपला मिळाला नवा विजेता

अर्जुन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवली. या स्टोरीत त्याने पृथ्वी शॉ आणि त्याचे लहानपणापासूनचे फोटो शेअर करत 'मित्रा स्ट्राँग रहा तू लवकरात लवकर बरा व्हावास अशी प्रार्थना करतो.' असे कॅप्शनही दिले.

Prithvi Shaw Arjun Tendulkar
ISSF World Championships : भारताने जागतिक नेमबाजी स्पर्धेत पटकावले तिसरे सुवर्ण

पृथ्वी शॉ काऊन्टीमध्ये ज्या संघाकडून खेळतो त्या नॉर्थम्पटनशायरने शॉच्या दुखापतीबाबत माहिती दिली. 'डरहम विरूद्धच्या सामन्यात फिल्डिंग करत असताना पृथ्वी शॉच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीच्या स्कॅनचे रिझल्ट सकाळी मिळाले आहेत. त्यामध्ये पृथ्वी शॉची दुखापत गंभीर दिसत आहे.' असे अधिकृत वक्तव्य नॉर्थम्पटनशायरन प्रसिद्ध केलं होतं.

23 वर्षाच्या पृथ्वी शॉने काऊन्टी वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये फक्त 4 सामन्यात 429 धावा ठोकल्या होत्या. त्याने सोमेरेस्टविरूद्धच्या सामन्यात 153 चेंडूत 244 धावा केल्या होत्या. नॉर्थम्पटनने हा सामना 87 धावांनी जिंकला होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com