Arjun Tendulkar: ठरलं तर मग! रणजी ट्रॉफीत कहर केल्यानंतर अर्जुन IPL 2023 मध्ये खेळणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Tendulkar IPL 2023

Arjun Tendulkar: ठरलं तर मग! रणजी ट्रॉफीत कहर केल्यानंतर अर्जुन IPL 2023 मध्ये खेळणार ?

Arjun Tendulkar IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगसाठी 23 डिसेंबरला मिनी लिलाव होणार आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून संघांचे लक्ष वेधून घेण्याचे काम युवा खेळाडू करत आहेत. या यादीत सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर फलंदाजांपैकी एक आहे. मुंबईने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये अर्जुनचा आधीच समावेश केला असला तरी त्याच्या पदार्पणाच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

हेही वाचा: IND vs BAN: चालू सामन्यात विराट कोहलीचा राग अनावर, पंचांच्या निर्णयावर संतापला

डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये गोव्याकडून खेळत आहे. अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. राजस्थानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 207 चेंडूंचा सामना करत 120 धावांचे शतक झळकावले. या इनिंगमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या बॅटमधून 16 चौकार आणि 2 षटकार दिसले.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : मोरोक्कोचे इतिहास रचण्याचे स्वप्न भंगले; गतवेळच्या उपविजेत्याचा 'थर्ड प्लेस'वर शेवट

अर्जुन तेंडुलकरने या सामन्यात बॅटने अप्रतिम खेळ दाखवल्यानंतर चेंडूने कहर केला. त्याने 23.1 षटके टाकताना 103 धावा दिल्या आणि 3 मोठे बळी घेतले. त्याने 63 धावांवर राजस्थानचा फलंदाज महिपाल लोमरोर, 40 धावांवर सलमान खान आणि 38 धावांवर अनिकेत चौधरीला रस्ता दाखवला. या कामगिरीनंतर अर्जुन तेंडुलकरची आयपीएल 2023 मध्ये खेळण्याची शक्यताही वाढली आहे. अर्जुन तेंडुलकर गेल्या 2 वर्षांपासून आयपीएलचा भाग आहे, परंतु त्याने अद्याप पदार्पण सामना खेळलेला नाही.

हेही वाचा: FIFA World Cup 2022 : मोरोक्कोने सामना गमावून देखील कमावले 205 कोटी, क्रोएशियालाही मिळाली मोठी रक्कम

अर्जुन तेंडुलकरने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत 1 प्रथम श्रेणी सामना, 7 लिस्ट ए सामने आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 104 धावा आणि 3 विकेट्स, लिस्ट ए मध्ये 259 धावा आणि 8 विकेट्स आणि टी-20 मध्ये 180 धावा आणि 12 बळी घेतले आहेत. रणजी ट्रॉफीशिवाय अर्जुन तेंडुलकरने यावेळी विजय हजारे आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही चमकदार कामगिरी केली आहे.