धोनीवर अशी वेळ येणं हे दुर्दैव

वृत्तसंस्था
शनिवार, 20 जुलै 2019

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एवढ्याच निवडत्ती घेण्याच्या विचारात नाही असे त्याचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार अरुण पांडे यांने स्पष्ट केले आहे. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एवढ्याच निवडत्ती घेण्याच्या विचारात नाही असे त्याचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार अरुण पांडे यांने स्पष्ट केले आहे. 

गेल्या काही दिवसांत धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनीवर सर्वस्तरातून राजीनामा देण्यासाठी दबाब आणला जात आहे. मात्र, त्याचा अत्यंत खास मित्र असलेल्या अरुणने त्याच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. 

''एवढ्यात निवृत्ती घेण्याचा त्याचा कोणताही विचार नाही. सातत्याने त्याच्या भविष्याबाबत उठणाऱ्य़ा अफवा या दुर्दैवी आहेत.'' अशा शब्दांत त्याने आपली नाराजी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Pandey Delivers Big Update On MS Dhonis Future