ICC ने घेतली मोठी ॲक्शन! सामना जिंकूनही ऑस्ट्रेलियाचे WTC पॉईंट्स कापले जाणार; जाणून घ्या काय झालं?

Ashes 2023 ENG vs AUS Australia and England
Ashes 2023 ENG vs AUS Australia and England

Ashes 2023 ENG vs AUS : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेसचा पहिला कसोटी सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने 2 गडी राखून विजय मिळवला. पण दोन्ही संघांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.

याशिवाय त्याचे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे गुणही वजा करण्यात आले आहेत. दोन्ही संघांवर क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या आयसीसीने ही कारवाई केली आहे. म्हणजे विजयानंतर कांगारूं संघाला मोठा धक्का आहे. दुसरीकडे हरल्यानंतरही इंग्लंडचे दुखणे कमी झालेले नाही.

Ashes 2023 ENG vs AUS Australia and England
VIDEO: बॅट अन् हेल्मेट फेकलं अन्... कर्णधार पॅट कमिन्सनं थाटात साजरा केला कांगारूंचा विजय

स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसीने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दंड ठोठावला आहे. दंडाअंतर्गत दोन्ही संघांना मॅच फीच्या 40 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत 2-2 गुणही गमावावे लागतील.

2023 च्या अ‍ॅशेस मालिकेतील इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने 12 गुण मिळवले होते. मात्र आता 2 गुण वजा केल्यानंतर केवळ 10 गुण शिल्लक राहणार आहेत. दुसरीकडे, कसोटी सामना गमावल्यानंतर एकही गुण मिळवू न शकलेल्या इंग्लंडचा संघ आता शून्यावरून -2 वर गेला आहे.

Ashes 2023 ENG vs AUS Australia and England
Pat Cummins Captaincy : पहिला डाव फसला तरी कमिन्सनं करून दाखवलं, रोहित कधी शिकणार?

इंग्लंडच्या खेळाडूंना एक कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंना एका कसोटीसाठी 16 लाख रुपये मिळतात. आता 40 टक्के दंडानुसार इंग्लंडसाठी 6 लाख रुपये आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी 6 लाख 40 हजार रुपये कापले जाणार आहे.

यापूर्वीही ऑस्ट्रेलियाला दंड ठोठावण्यात आला होता

इंग्लंड दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला स्लो ओव्हर रेटचा बळी पडण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या WTC फायनलमध्ये याच कारणामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला होता आणि मॅच फीमध्ये 80 टक्के कपात करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com