Ashes 2023 Eng vs Aus: अ‍ॅशेसमध्ये इंग्लंडचा जबरदस्त पलटवार, तिसऱ्या कसोटीत सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवले

ashes 2023 england beat australia in 3rd test
ashes 2023 england beat australia in 3rd test

Ashes 2023 Eng vs Aus : अखेर यजमान इंग्लंड क्रिकेट संघाने अ‍ॅशेस या प्रतिष्ठेच्या मालिकेतील आव्हान कायम राखले. पहिल्या दोन कसोटीत पराभूत झालेल्या इंग्लंडने येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर तीन विकेट राखून मात केली. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ अ‍ॅशेस मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे. या मालिकेतील दोन कसोटी अद्याप बाकी आहेत.

ashes 2023 england beat australia in 3rd test
World Cup Qualifiers 2023: नेदरलँड्सविरुद्ध फायनल जिंकून श्रीलंका वर्ल्डकप विजयाचा मोठा दावेदार?

ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडसमोर २५१ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेरीस बिनबाद २७ धावा केल्या होत्या. मिचेल स्टार्कने बेन डकेट (२३ धावा) व मोईन अली (५ धावा) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मिचेल मार्शने झॅक क्राउलीला ४४ धावांवर बाद केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ३ बाद ९३ धावा अशी झाली.

ashes 2023 england beat australia in 3rd test
Team India: 'माझ्या नशिबात कायतरी...' IPL मध्ये दमदार कामगिरीनंतरही टीम इंडियात जागा...

ज्यो रुट व हॅरी ब्रुक ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच कर्णधार पॅट कमिन्सच्या. गोलंदाजीवर रुट २१ धावांवर बाद झाला. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यालाही निर्णायक क्षणी ठसा उमटवता आला नाही. स्टार्कनेच त्याला १३ धावांवर बाद केले. यानंतर डावखुरा गोलंदाज स्टार्कने जॉनी बेअरस्टोचा पाच धावांवरच त्रिफळा उडवला. इंग्लंडची अवस्था ६ बाद १७१ धावा अशी झाली.

तळाच्या फलंदाजांची यशस्वी झुंज

हॅरी बुकला अ‍ॅशेस मालिकेत आतापर्यंत सूर गवसला नव्हता; पण या डावात त्याने इंग्लंडला गरज असताना दबावाखाली नेत्रदीपक खेळी केली. त्याने ९३ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ७५ धावांची खेळी साकारली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. याप्रसंगी कसोटीला कलाटणी मिळणार असे वाटू लागले; पण ख्रिस वोक्स व मार्क वूड या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडसाठी मोलाची कामगिरी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. वोक्स याने नाबाद ३२ धावांची आणि वूड याने नाबाद १६ धावांची खेळी केली. वूड याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com