Team India: 'माझ्या नशिबात कायतरी...' IPL मध्ये दमदार कामगिरीनंतरही टीम इंडियात जागा...

Team India
Team India

Jitesh Sharma : पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली, तेव्हा आधीच्या दोन मालिकांमध्ये संघाचा भाग असलेल्या खेळाडूंना संघात स्थान न दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले.

अशा परिस्थितीत टी-20 संघातून बाहेर पडल्यानंतर त्या खेळाडूची पहिली प्रतिक्रिया पाहायला मिळाली आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्मा आहे. जितेशला दोन मालिकांमध्ये संधी मिळाली, पण तो आता बाहेर आहे.

Team India
BanW vs IndW 1st T20 : हरमनप्रीत अन् स्मृती मानधनाचा तडाखा! पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पाजले पाणी

सलग दोन आयपीएल आणि देशांतर्गत टी-20 स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करूनही संघातून वगळल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माची पहिली प्रतिक्रिया आली आहे. तो क्रिकेट डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला आहे की, माझ्यासाठी देवाची मोठी योजना आहे. त्याची पहिल्या संघात निवड झाली आहे, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. जितेश शर्माची न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी निवड झाली. मात्र, तो आता संघाचा भाग नाही.

Team India
Ishant Sharma : संघाबाहेर असलेल्या इशांत शर्माची वेस्ट इंडिज दौऱ्यावर अचानक एन्ट्री!

जितेश न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग होता. त्याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकासोबतच्या त्याच्या अनुभवाबद्दलही सांगितले आणि म्हणाले, राहुल द्रविड सरांनी मला सांगितले की तुम्ही खूप चांगले केले आणि आम्ही अशा खेळाडूंच्या शोधात आहोत. जेव्हा मी त्यांना सांगितले की मला मोठ्या धावा करायच्या आहेत, तेव्हा त्यांनी मला सांगितले की, तू कोणत्या स्थितीत खेळतोस, त्या धावांनी फरक पडत नाही, विजयासाठी तू किती योगदान देत आहेस हे संघासाठी महत्त्वाचे आहे.

Team India
Asia Cup 2023 : चाहत्यांची प्रतीक्षा संपली! आशिया कपच्या शेड्यूलबद्दल मोठी अपडेट

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. उभय संघांमधील पहिला कसोटी सामना डॉमिनिका येथे खेळला जाणार आहे. टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. पहिली कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली जाईल, त्यानंतर शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com