यंदा ऍशेस नव्या रुपात; जर्सीवर खेळाडूचे नाव आणि नंबरसुद्धा

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

यंदाच्या ऍशेसमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि नंबरही देण्यात येणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जर्सीवर नाव आणि नंबर देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

लंडन : यंदाच्या ऍशेसमध्ये खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि नंबरही देण्यात येणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जर्सीवर नाव आणि नंबर देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

यापूर्वी अनेक खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये ही मागणी केली होती. अखेर ऍशेसमध्ये याची सुरवात होणार आहे. 

इंग्लंडने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन कर्णधार ज्यो रुटचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्या जर्सीवर त्याचे नाव 'रुट' आणि 66 नंबर छापला आहे. या नव्या जर्सीला सोशल मीडियावरुन संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

ऍशेसला सुरवात होण्यापूर्वी इंग्लंच आयर्लंडविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना 24 जुलैला होईल. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्टपासून ऍशेस मालिकेला सुरवात होईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashes Jerseys To Have Players Names And Numbers For The First Time