Ashes Series : जाता जाता बेअरस्टोने हाणला टोला, पलटावर करत स्मिथ म्हणाला...

Steve Smith : आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील फारशी चकम दाखवता आली नाही. तो अवघ्या 2 धावा करून मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
Ashes Series Steve Smith Jonny Bairstow
Ashes Series Steve Smith Jonny Bairstowesakal

Cricket Update : अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंग्ल येथील लीड्समध्ये खेळवला जात आहे. वेगवान गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या दोन दिवशीच तीन डाव संपुष्टात आले. पहिल्या डावात 26 धावांची माफक आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव सुरू केला. मात्र इंग्लंडने दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रोलियाची अवस्था 4 बाद 116 धावा अशी केली.

Ashes Series Steve Smith Jonny Bairstow
Tamim Iqbal : असे काय झाले? तमीम इक्बालचा २४ तासांत यू-टर्न, घेतला मोठा निर्णय मागे

दरम्यान आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथला देखील फारशी चकम दाखवता आली नाही. तो अवघ्या 2 धावा करून मोईन अलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र तो बाद झाल्यानंतर इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेअरस्टोने त्याला टोमणा मारला. या टोमण्याला स्टीव्ह स्मिथने देखील प्रत्युत्तर दिले.

मोईन अलीने स्मिथला 2 धावांवर झेलबाद केले. यानंतर नाराज झालेला स्मिथ पॅव्हेलियनकडे जाण्यासाठी पलटला तेवढ्यात बेअरस्टो (Jonny Bairstow) त्याला 'पुन्हा भेटू स्मज' असे म्हणाला. त्यावर स्मिथ थांबून त्याला काय म्हणालास दोस्ता असं बोलला. त्यावर बेअरस्टोने उत्तर दिलं की मी म्हणालो 'चीअर्स पुन्हा भेटू.'

Ashes Series Steve Smith Jonny Bairstow
World Cup 2023 : वनडे वर्ल्डकपमधील भारताचे शेड्युल झाले अपडेट; टीम इंडिया 'या' तारखेला...

ऑस्ट्रेलियाकडे 142 धावांची आघाडी

इंग्लंडचा पहिला डाव 237 धावात गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी 4 बाद 116 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे 142 धावांची आघाडी झाली होती. ट्रॅविस हेड 18 तर मिचेल मार्श 17 धावा करून नाबाद होते. मोईन अलीने 2 तर ब्रॉड आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

पॅट कमिन्सने घेतल्या 6 विकेट्स

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 237 धावात गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने 18 षटकात 91 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 80 धावा करत एकाकी झुंज दिली. झॅक क्राऊलीने 33, मार्क वूडने 8 चेंडूत 24 धावा केल्या. मोईन अलीने 21 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 2 तर मार्श आणि मर्फीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com