Australia Open: ४४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियन ओपनवर ऑस्ट्रेलियन किस

Ashleigh Barty won Australian Open For the First time
Ashleigh Barty won Australian Open For the First timeesakal

मेलबर्न: दोन ग्रँडस्लॅम विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने (Ashleigh Barty) ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचे (Australian Open) आपले स्वप्न दोन सेटमध्येच पूर्ण केले. तिने फायनलमध्ये अमेरिकेच्या डॅनले कॉलिनचा (Danielle Collin) ६-३, ७-६(७-२) असा पराभव करत पहिल्या वहिल्या ऑस्ट्रेलियन ओपनवर आपले नाव कोरले. ४४ वर्षानंतर एका ऑस्ट्रेलियन टेनिसपटूने ऑस्ट्रेलियन ओपनच्या ट्रॉफीवर किस उमटवला. (Ashleigh Barty won Australian Open For the First time)

Ashleigh Barty won Australian Open For the First time
क्रिकेटसाठी घेतला होता टेनिसमधून ब्रेक! पाहा विम्बल्डन सम्राज्ञीचे खास फोटो

जागतिक क्रमवरीत अव्वल स्थानावर असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने घरच्या मैदानावर फालनलची धडाक्यात सुरूवात केली. तिने पहिल्या सेटमध्ये डॅनले कॉलिनवर (Danielle Collin) वर्चस्व निर्माण करत पहिला सेट ६-३ अशा फरकाने जिंकला. बार्टीचा धडाका पाहता ती ही फायनल आरामात जिंकणार असे वाटत होते.

मात्र दुसऱ्या सेटमध्ये डॅनले कॉलिनने जोरदार पुनरागमन केले. तिने क्रमवरीत अव्वल असणाऱ्या बार्टीला दुसऱ्या सेटमध्ये थोडी देखील संधी दिली नाही. तिने बार्टीची दोनदा सर्व्हिस ब्रेक करत दुसऱ्या सेटमध्ये ५-१ अशी मोठी आघाडी घेतली. हा सेट कॉलिन आरामात जिंकणार असे वाटत असतानाच अ‍ॅश्ले बार्टीने (Ashleigh Barty) आपला खेळ कमालीचा उंचावला.

Ashleigh Barty won Australian Open For the First time
एका मताने स्टार्कला मिळाले अ‍ॅलन बॉर्डर मेडल; कॅप्टन कमिन्सची प्रतिक्रिया

आपण अव्वल स्थानावर का आहोत हे दाखवून देत बार्टीने ५-१ अशी पिछाडी भरून काढत ५-५ अशी बरोबरी साधली. त्यानंतर टायब्रेकरवर गेलला दुसरा सेट ७-६(७-२) असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनवर (Australian Open) अनेक दशकांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूची मोहर उमटवली.

यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्टिन ओनिल यांनी १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती. त्या देखील या ऐतिहासिक विजयाच्या साक्षिदार होण्यासाठी टेनिस कोर्टवर हजर होत्या. त्यांनी 'मला बार्टीचा अभिमान वाटतो मी तिची मोठी फॅन आहे. मला तिच्याकडे ही ट्रॉफी हस्तांतरित करताना अत्यानंद होत आहे कारण ती याची हकदार आहे.' अशी प्रतिक्रिया देत बार्टीची पाठ थोपटली. बार्टीने यापूर्वी फ्रेंच ओपन आणि विंम्बल्डनवर देखील आपले नाव कोरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com