एका मताने स्टार्कला मिळाले अ‍ॅलन बॉर्डर मेडल; कॅप्टन कमिन्सची प्रतिक्रिया

Mitchell Starc Won Allan Border Medal by One Vote Pat Cummins Reaction
Mitchell Starc Won Allan Border Medal by One Vote Pat Cummins Reaction esakal

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला (Mitchell Starc) प्रतिष्ठित अ‍ॅलन बॉर्डर मेडल (Allan Border Medal) जाहीर झाले आहे. स्टार्कबरोबरच ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू महिला क्रिकेटर अ‍ॅश्लेघ ग्रॅडनरला (Ashleigh Gardner) बेलेंडा क्लार्क मेडलने (Belinda Clark Medal) नावाजण्यात आले. स्टार्कला बॉर्डर मेडल मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) 'या व्यक्तीसाठी मी खूप आनंदी आहे. गुणवत्ता, चिकाटी, स्पर्धात्मकता, सांघिक वृत्ती आणि महान खेळाडू.' अशी प्रतिक्रिया दिली.

अ‍ॅलन बॉर्डर मेडलसाठी मिचेल स्टार्क आणि टी २० वर्ल्डकपचा हिरो मिचेल मार्शमध्ये (Mitchell Marsh) चुरस निर्माण झाली होती. अखेर स्टार्कला १०७ तर मार्शला १०६ मते मिळाली. त्यामुळे स्टार्क एका मताने अ‍ॅलन बॉर्डर मेडलचा मानकरी ठरला. या स्पर्धेत ट्रॅव्हिस हेडला (Travis Head) ७२ मते पडली तो तिसऱ्या स्थानावर राहिला.

मिशेल स्टार्कसाठी हे गतवर्ष खूप चांगले गेले. त्याने सगळ्या फॉरमॅटमध्ये मिळून ४३ विकेट घेतल्या. त्याची सरासरी २४.४ इतरी होती. ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला 'Male ODI Player of the Year' पुरस्कारही देण्यात आला. त्याने वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत दमदार गोलंदाजी केली होती. त्याने पहिल्याच सामन्यात ४८ धावात ५ बळी घेतले होते.

Mitchell Starc Won Allan Border Medal by One Vote Pat Cummins Reaction
आमच्याकडे अनेक कॅप्टन पण, रिझल्ट हा मुद्दा आहे : शमी

पिंक बॉल मास्टर स्टार्कने अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) २५.३६ च्या सरासरीने १९ विकेट घेतल्या होत्या. त्याने अ‍ॅडलेडमधील दिवस रात्र कसोटीत ३७ धावात ४ विकेट घेण्याची विशेष कामगिरी केली होती. स्टार्कने गेल्या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये २६.८ च्या सरासरीने २४१ धावा देखील केल्या होत्या. तो गेल्या १२ महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप १० फलंदाजांमध्ये देखील सामिल आहे.

Mitchell Starc Won Allan Border Medal by One Vote Pat Cummins Reaction
ICC U19 WC: निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह, उपांत्यपूर्व फेरीला मुकणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com