esakal | 'कोरोना काळात कुटुंबाला माझी गरज'; अश्विनची IPL मधून माघार

बोलून बातमी शोधा

अश्विनची IPL मधून माघार, कोरोनामुळे घेतला निर्णय

अश्विनची IPL मधून माघार, कोरोनामुळे घेतला निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. दिवसाला साडेतीन लाखांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीतही भारतामध्ये बायो बबलच्या माध्यमातून आयपीएलचा महासंग्राम सुरु आहे. 9 एप्रिल रोजी मुंबई आणि आरसीबी यांच्या सामन्यानं हा रनसंग्राम सुरु झाला होता. आता जवळपास तीन आठवडे उलटल्यानंतर दिल्लीचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन यानं स्पर्धेतून माघार घेतली आहे.

दिल्ली संघानं आणि आर. अश्विन यांनी आपापल्या अधिकृत ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे. कुटुंबिय आणि जवळचे नातेवाईक कोरोनाशी लढत आहेत. त्यामुळे अशा कठीण प्रसंगी कुटुंबासोबत राहणं योग्य आहे. त्यामुळे आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय अश्विन यानं घेतला आहे. अश्विन यानं ट्विटमध्ये म्हटलेय की, 'उद्यापासून मी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि नातेवाईक कोरोनाशी लढा देत आहेत. अशा कठीण प्रसंगात मी त्यांच्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. सर्व ठीक झाल्यास मी पुन्हा खेळण्यासाठी प्रयत्नशील असेन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स.'

रविवारी सनरायझर्स हैदराबाद विरोधात झालेल्या सामन्यात अश्विन खेळत होता. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात अश्विन याची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नव्हती. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीनं हैदराबाद संघाचा पराभव केला. सामना झाल्यानंतर अश्विननं रात्री आयपीएलमधून माघार घेत असल्याचं ट्विट केलं आहे.