Asia Cup 2022 साठी हाँगकाँग पात्र, 31 ऑगस्टला भारताशी सामना; जाणून घ्या शेड्यूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Asia Cup 2022

Asia Cup 2022 साठी हाँगकाँग पात्र, 31 ऑगस्टला भारताशी सामना; जाणून घ्या शेड्यूल

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 आशिया कपसाठी पात्रता फेरी पूर्ण झाली आहे. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये मुख्य फेरीचे सामने सुरू होणार आहेत. आशिया चषकासाठी पात्र ठरणारा हाँगकाँग हा सहावा संघ ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानसह हाँगकाँगला अ गटात स्थान मिळाले आहे. 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगची भारताशी लढत होणार आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात हाँगकाँगने आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणाऱ्या यूएईचा 8 गडी राखून पराभव केला.

हाँगकाँगने या विजयासह आशिया कपमधील आपल स्थान निश्चित केले. हाँगकाँगचा संघ चौथ्यांदा आशिया कपमध्ये खेळणार आहे. यापूर्वी हाँगकाँगने 2004, 2008 आणि 2018 मध्ये आशिया चषकात प्रवेश केला होता. मात्र टी-20 फॉरमॅटमध्ये पहिल्यांदाच हाँगकाँगचा संघ आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणार आहे.

हेही वाचा: Asia Cup 2022: शेन वॉटसनचा मोठा दावा, म्हणाला- कोहली धमाकेदार कामगिरी करेल, कारण...

हाँगकाँग पात्र झाल्याने 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेतील दोन्ही गटांचे चित्र स्पष्ट झाले आहे. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग अ गटात आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश ब गटात आहेत. आयसीसी क्रमवारीत हाँगकाँग सध्या 23 व्या क्रमांकावर आहे. असे असतानाही हाँगकाँगने सलग तीन सामने जिंकून आशिया चषकासाठी पात्रता मिळवण्यात यश मिळवले आहे.

आशिया कप 2022 चे दोन्ही गट

  • अ गट - भारत, पाकिस्तान, हँककॉंग

  • ब गट - श्रीलंका, बांगलादेश अफगाणिस्तान

आशिया कप 2022 चे वेळापत्रक

  • 27 ऑगस्ट - श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

  • 28 ऑगस्ट - भारत विरुद्ध पाकिस्तान

  • 30 ऑगस्ट - बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

  • 31 ऑगस्ट - भारत विरुद्ध हाँगकाँग

  • 1 सप्टेंबर - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश

  • 2 सप्टेंबर - पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग

Web Title: Asia Cup 2022 Full Schedule After Hong Kong Qualify India And Pakistan A Group Details Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..