Asia Cup 2022: शेन वॉटसनचा मोठा दावा, म्हणाला- कोहली धमाकेदार कामगिरी करेल, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shane watson virat kohli

Asia Cup 2022: शेन वॉटसनचा मोठा दावा, म्हणाला- कोहली धमाकेदार कामगिरी करेल, कारण...

Shane Watson on Virat Kohli : महिनाभराच्या विश्रांतीनंतर विराट कोहली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पुन्हा सक्षम झाला असेल आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत तो निश्चितच ठसा उमटवेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने व्यक्त केला आहे.

काही वर्षांपूर्वी गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून फलंदाजीत सातत्य राखणारा कोहली आता फॉर्मसाठी कमालीचा झगडत आहे. नोव्हेंबर २०१९ नंतर त्याला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलेले नाही. आता वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकांतून विश्रांती घेणारा विराट कोहली आता आशिया करंडक स्पर्धेसाठी सज्ज होत आहे.

क्रिकेटच्या मानसिकतेपासून दूर रहाणारी महिनाभराची ही विश्रांती विराटसाठी शारीरिक आणि मानसिकता अधिक भक्कम करण्याकरिता निश्चितच फायदेशीर ठरेल. असे सांगून वॉटसन पुढे म्हणाला, धावा होत नसल्यामुळे विराटची ऊर्जा कमी झालेली वाटत होती. आयपीएलमध्येही तो मानसिकदृट्या थकलेला दिसून येत होता.

हेही वाचा: Virat Kohli : खराब फॉर्मवर विराटने तोडले मौन, म्हणाला- 'टप्प्यातून गेल्याशिवाय...'

ब्रेकवर जाण्यापूर्वी विराट

कोहली इंग्लंडविरुद्ध खेळला होता. या दौऱ्यातील सर्व प्रकारांतील सहा सामन्यांत मिळून त्याला ७६ धावाच करता आल्या होत्या. आशिया करंडक स्पर्धा ही आगामी विश्वकरंडक स्पर्धेची नांदी आहे. त्यामुळे येथे चांगल्या धावा केल्या आणि फॉर्म मिळवला तर याचा फायदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वककरंडक स्पर्धेत होईल. विराट हा महान फलंदाज आहे आणि तो लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणे ही काळाची गरज आहे, असेही वॉटसन म्हणाला.

शेन वॉटसन आणि विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघातून खेळलेले आहे त्यामुळे वॉटसन कोहलीची क्षमता जवळून ओळखून आहे.

Web Title: Shane Watson Made Big Claim Said Virat Kohli Will Perform With Ind Vs Pak Asia Cup 2022 Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..