IND vs PAK Pitch Report : भारत-पाक सामन्यात कोणाला मिळणार खेळपट्टीची मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK Pitch Report

IND vs PAK Pitch Report : भारत-पाक सामन्यात कोणाला मिळणार खेळपट्टीची मदत

IND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषकाला सुरुवात झाली असून आज संध्याकाळी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना दुबई क्रिकेट आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानचे संघ 10 महिन्यांनंतर एकमेकांशी भिडत आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानने यूएईमध्ये गेल्या 17 सामन्यांपैकी केवळ एक टी-20 सामना गमावला आहे. गेल्या वर्षी दुबईच्या खेळपट्टीवर पाकिस्तानने टीम इंडियाचा पराभव केला होता.

हेही वाचा: Asia Cup IND vs PAK Playing-11 : पंत-कार्तिक कोण होणार बाहेर? हे असू शकते भारत-पाक प्लेइंग-11

IND vs PAK खेळपट्टी :

दुबई इंटरनॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला अनुकूल वाटत असली तरी अलीकडच्या काळात ती वेगवान गोलंदाजांना मदत करत आहे. गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने भारतीय टॉप ऑर्डरचा नाश केला होता. या मैदानावर अलीकडच्या काळात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.

IND vs PAK हवामान (Weather Report) :

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया चषक सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दुबईत रविवारी आकाश निरभ्र राहण्याची अपेक्षा आहे. पावसामुळे सामन्यात अडथळा येणार नाही. रविवारी संध्याकाळी वाऱ्याचा वेग सुमारे 17 किमी/तास असेल. तापमान 31 ते 40 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहू शकते.

हेही वाचा: IND vs PAK Asia Cup 2022 Live : डिव्हिलियर्सने 100 व्या टी-20 सामन्यापूर्वी विराटला दिल्या खास शुभेच्छा!

आशिया कपसाठी भारत संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

Web Title: Asia Cup 2022 Ind Vs Pak Pitch Report And Weather Updates India Vs Pakistan Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..